ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

…..अखेर अकलूजच्या सुप्रसिद्ध सयाजीराजे वॉटर पार्क वर अकलूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल….

सयाजीराजे वॉटरपार्क चे व्यवस्थापक ऑपरेटर व संबंधित विभागाचे कर्मचारी यांच्या विरोधात तक्रार दाखल तसेच मूळ व्यवस्थापक यांच्या विरोधात तक्रार आहे….

अकलूज (बारामती झटका)

अकलूज, ता. माळशिरस येथील मोहिते पाटील यांच्या सुप्रसिद्ध सयाजीराजे वॉटरपार्कच्या व्यवस्थापक ऑपरेटर व संबंधित विभागाचे कर्मचारी यांच्यावर अकलूज पोलीस स्टेशन येथे तक्रारदार अभिजीत शशिकांत धुमाळ, रा. विरवाडी भिगवन, ता. इंदापूर, यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (बी एन एस) 2023 कलम 106 ( 1 ) 125( a) 125 ( b) 3 ( 5) नुसार अकलूज पोलीस स्टेशन येथे दि. 19/06/2025 रोजी गुन्हा नोंद झालेला आहे.

अभिजीत शशिकांत धुमाळ वय 34 वर्ष, व्यवसाय नोकरी, रा. विरवाडी भिगवन, ता. इंदापूर, जि. पुणे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जामध्ये दि. 18/06/2025 रोजी दुपारी 1. 30 वाजनेचे सुमारास मी इंदापूर येथे बारामती सहकारी बँक शाखा येथे ड्युटीवर असताना लहान भाऊ अक्षय धुमाळ याने फोन करून सांगितले की भाऊ तुषार याचे मोबाईल नंबर वर फोन केला असता त्याचा फोन कोणीतरी इसमाने उचलला व त्याने सांगितले की तुमच्या माणसाचा सयाजीराजे वॉटर पार्क आनंदनगर अकलूज मध्ये राईड करताना अपघात झाला आहे, त्याच्या हाताला मार लागला आहे, तुम्ही लवकर अश्विनी हॉस्पिटल अकलूज येथे जावा, त्याप्रमाणे आपत्कालीन विभागांमध्ये पाहिले असता तेथे माझा भाऊ तुषार शशिकांत धुमाळ याचे डोकीस पाठीमागील बाजूस मार लागून मोठी जखम होऊन त्यातून रक्तस्त्राव होत होता. कानातून रक्तस्राव होत होता. दोन्ही पायाचे गुडघ्यास खरचटले होते. डोळे मिटलेले होते. तेथील डॉक्टरांनी भाऊ तुषार याला तपासून तो मयत झाला असल्याचे सांगितले.

त्यानंतर मी हॉस्पिटलच्या बाहेर आलो तेव्हा तेथे माझे ओळखीचे धनाजी मल्हारी बंडगर रा. मदनवाडी भिगवन हे भेटले व त्यांनी मला सांगितले की, मी सयाजीराजे वॉटर पार्क येथे गेलो होतो. तेथे माजी व तुषार यांची भेट झाली. मी ऑक्टोपस राईड करता एका पाळण्यात व तुषार हा त्याचा मित्र वैभव आप्पा रुपनवर रा. डोंबाळवाडी याचे सोबत दुसऱ्या पाळण्यात बसला होता. चालू झाल्यानंतर एक फेरी झाल्यानंतर दुसऱ्या फेरीच्या वेळी तुषार व त्याचा मित्र वैभव बसलेला पाळणा अचानक तुटून हवेत उडून परत जमिनीवर पडला. ऑक्टोपस ऑपरेटरने ऑक्टोपस राईड बंद केला. त्यानंतर आम्ही खाली उतरून तुषार यास पाहिले असता त्याचे डोकीस पाठीमागील बाजूस मार लागून गंभीर जखम होऊन रक्त येऊ लागले. तसेच वैभव याचे डोकीस उजव्या हातात मार लागला होता. तेथील लोकांनी व मी तुषार व वैभव यास उचलून ॲम्बुलन्समधून उपचारास अश्विनी हॉस्पिटल अकलूज येथे दाखल केले असल्याचे सांगितले.

तरी काल दि. 18/06/2025 रोजी दुपारी 12. 45 चे सुमारास माझा भाऊ तुषार शशिकांत धुमाळ वय 35 वर्ष, रा. विरवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे, हा सयाजीराजे वॉटरपार्क, आनंदनगर, अकलूज येथील ऑक्टोपस राईड पाळण्यामध्ये बसला असता सदरचा पाळणा हा ऑपरेटरने भरधाव वेगाने चालवून त्याचा पाळणा तुटून जमिनीवर पडून पाळण्यात बसलेला माझा भाऊ तुषार हा जमिनीवर पडून त्याचे डोकीस मार लागून त्यास गंभीर जखमी होऊन त्याचे मरणास कारणीभूत होऊन तसेच वैभव आप्पा रुपनवर रा. डोंबाळवाडी, ता. माळशिरस, यास गंभीर जखम होण्यास कारणीभूत झाला आहे. म्हणून माझी येथील व्यवस्थापक ऑपरेटर व इतर संबंधित लोकांनी ॲक्टोपस पाळण्याची देखभाल व्यवस्थित न केल्याने सदरचा अपघात घडणेस कारणीभूत झालेले आहेत. म्हणून माझी सयाजीराजे वॉटर पार्कचे व्यवस्थापक ऑपरेटर व संबंधित विभागाचे कर्मचारी यांचे विरुद्ध माझी तक्रार आहे. तसेच मूळ व्यवस्थापक यांचे विरुद्ध तक्रार आहे. अशा तक्रारी अर्जावरून अकलूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom