ताज्या बातम्याराजकारण

अखेर ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

बारामती झटका वृत्त खरे ठरले, माळशिरस तालुक्यातील दहा गावांची दोनदा दिवाळी साजरी होणार..

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील दहा गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे या दहा गावांची दिवाळी डबल साजरी होणार आहे.

त्यामध्ये माळीनगर, धर्मपुरी, कारूंडे, वाफेगाव, कोंढारपट्टा, दहिगाव, देशमुखवाडी, लवंग, कण्हेर, सवतगव्हाण या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत डबल दिवाळी साजरी होणार आहे.

माहे जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व सन २०२० मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणूक न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या( सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी पारंपारिक पद्धतीने राबवण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. थेट जनतेतील सरपंच पदामुळे निवडणुकीत रस्सीखेच, रंगत व चुरस वाढणार आहे.

या निवडणुकीमध्ये दि. १६/१०/२०१३ ते २०/१०/२०२३ या दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे मागवण्यात व सादर करण्यात येणार आहे. तसेच या नामनिर्देशन पत्राची छाननी दि. २३/१०/२०२३ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत असणार आहे. तसेच दि. २५/१०/२०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी असणार आहे. निवडणूक चिन्ह नेमून देणे व निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी दि. २५/१०/२०२३ रोजी दुपारी ३ नंतर जाहीर करण्यात येणार आहे. तसेच मतदान दि. ०५/११/२०२३ रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत होणार आहे. मतमोजणी व निकाल दि. ०६/११/२०२३ रोजी करण्यात येणार आहे.

या दहा गावांचे सरपंच पदाचे व वार्डनिहाय आरक्षणाचा कार्यक्रम तहसीलदार सुरेश शेजुळ, निवासी नायब तहसीलदार अमोल कदम, महसूल नायब तहसीलदार सायली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अव्वल कारकून भाकरे यांनी सर्व निवडणुकीचे नियोजन तयार करून ठेवलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button