…. अखेर लवंग ते पंचवीस चार रस्त्याची प्रतीक्षा संपली; आ. बबनदादा शिंदे यांचे प्रयत्न व युवा नेते रणजीतभैय्या शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश….

लवंगचे युवा नेते राहुल दादा टिक, घमनआप्पा चव्हाण, प्रदीप कदम, हनुमंत भोसले, बाळासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले…
अकलूज (बारामती झटका)
माढा विधानसभा मतदार संघातील माळशिरस तालुक्यातील लवंग गावचा बहुप्रतीक्षेत 25/4 ते लवंग रस्ता माढा विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार षटकार आमदार बबनदादा शिंदे यांच्या शिफारशीतून व सोलापूर जिल्हा दूध संघाचे विद्यमान चेअरमन व भावी आमदार रणजीतभैया शिंदे यांच्या पाठपुराव्यातून मुख्यमंत्री सडक योजनेतून 5 कोटी 78 लाख 81 हजार रुपये चा 5.5 मिटरचा काँक्रेट रस्ता मंजूर झालेला आहे.

सदरचा रस्ता अतिशय खराब अवस्थेत होता. नागरिकांचे खूप हाल होत होते. अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याचे अवस्था अतिशय वाईट झाली होती. सदरच्या रस्त्याची मागणी लवंग गावचे युवा नेते. राहुलदादा टिक पाटील, घमनआप्पा चव्हाण, प्रदीप कदम, हनुमंत भोसले आणि बाळासाहेब पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला होता.


सदरचा रस्ता मंजूर झाल्यानंतर लवंग गावातील व आसपासच्या गावातील रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारक व नागरिकांमधून बबनदादांच्या कामगिरीचविषयी समाधान व्यक्त केले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.