…..अखेर शिखर शिंगणापूरच्या महादेव शंकराने तिसरा डोळा उघडला, कारखान्याच्या सभासदांना, कामगारांना न्याय मिळणार…..

“गोड साखरेची कडू कहाणी” शंभू महादेवाला गोड नैवेद्य कडू लागला, देवाभाऊच्या माध्यमातून श्री शंकराचा तिसरा डोळा उघडला….
पुरंदावडे (बारामती झटका)
भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये देवी-देवतांना अनन्य साधारण महत्त्व आहे. शेतकरी आपल्या शेतातील पिके, भाजीपाला, फळबाग पहिल्यांदा आपल्या घरातील किंवा गावातील देवांना नैवेद्य अर्पण करीत असतात. त्याच पद्धतीने उद्योजक, कारखानदार उत्पादित केलेल्या खाद्यपदार्थांचा प्रथम देवाला नैवेद्य दाखविला जातो. अशीच साखर कारखानदाराची गोड साखरेची कडू कहाणी झालेली आहे. शंभू महादेवाला गोड नैवेद्य असून सुद्धा कडू लागला आहे. देवाभाऊंच्या माध्यमातून श्री शंकराचा तिसरा डोळा उघडलेला आहे.. कारखान्याच्या सभासदांना व कामगारांना न्याय मिळण्यासाठी अखेर शिखर शिंगणापूरच्या महादेव श्रीशंकराने तिसरा डोळा उघडला असल्याची सभासद व कामगार यांच्यामधून चर्चा सुरू आहे..
साखर कारखानदारांकडून सभासद कामगारांची पिळवणूक करून त्यांच्या लेकराबाळांचा शिव्याशाप घेऊन तयार झालेली गोड साखर आपोआप कडूच होणार. शंभू महादेवाला साखरेचा गोड नैवेद्य कडू लागल्याने तिसरा डोळा उघडून पाहिल्यानंतर भयानक परिस्थिती पहावयास मिळाली आहे. आजपर्यंत सहन केले, आत्ता शेंडीवरून पाणी वाहायला लागल्याने खऱ्या अर्थाने शोषित, वंचित, पीडित यांचा तारणहार असणारे देवाभाऊ यांच्या श्री हरीच्या माध्यमातून गोड साखरेची कडू कहाणी या पर्वाला लवकरच सुरुवात होत आहे. अशी साखर पट्ट्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



