…..अखेर वादग्रस्त श्री. एस. ए. बोराटे ग्रामपंचायत अधिकारी बांगर्डे निलंबित….

ध्येयवेडी संघटना अध्यक्ष राजाभाऊ देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली बांगर्डे गावच्या भ्रष्टाचाराच्या आणि भोंगळ कारभाराविरुद्ध ध्येयवेडी संघटनेच्या लढ्याला यश, ग्रामसेवक निलंबित
माळशिरस (बारामती झटका)
ध्येयवेडी संघटना अध्यक्ष राजाभाऊ देवकाते व मारुती (आबा) मेटकरी (तत्कालीन रासप तालुका अध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली बांगर्डे गावच्या भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभाराविरुद्ध माळशिरस पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आंदोलन केलेले होते. ध्येयवेडी संघटनेच्या लढ्याला यश आलेले आहे. वादग्रस्त श्री. एस. ए. बोराटे ग्रामपंचायत अधिकारी बांगर्डे अखेर निलंबित झालेले आहेत.
गटविकास अधिकारी माळशिरस यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांचेकडील अधिकार प्रदान आदेशनुसार विस्ताराधिकारी चौकशी अहवाल कारणे दाखवा नोटिसा सहाय्यक गट विकास अधिकारी कार्यालयीन मंजूर टिपणी यांच्या आधारे श्री. एस. ए. बोराटे ग्रामपंचायत अधिकारी तत्कालीन ग्रामपंचायत बांगर्डे सध्या ग्रामपंचायत मारकडवाडी यांना निलंबन आदेशामध्ये स्तंभ 1 व 2 अन्वये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांचे कडील अधिकार प्रधान आदेशा अन्वये व विस्तार अधिकारी पंचायत समिती यांचे चौकशी अहवालातील तपासणी मधील आरोपांच्या मुद्द्यात दोषी आढळून आलेले आहेत. त्यांनी मोजे बांगर्डे ग्रामपंचायतमधील कर्तव्य कालावधीमध्ये त्यांनी त्यांचे कर्तव्य निरपवाद राहून सचोटीने पार पाडलेले नाही. श्री. एस. ए. बोराटे ग्रामपंचायत अधिकारी यांनी ग्रामपंचायत बांगर्डे येथील कामकाज करताना अनियमित कामकाज व गैरशिस्तीचे वर्तन केलेले असल्याने त्यांची महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम 1967 मधील नियम 3चा भंग केल्याने ते महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील 1964 नुसार कारवाईस पात्र आहेत, असे कळविण्यात आलेले होते. स्तंभ क्रमांक 4 व 5 अन्वये दैनंदिन कामकाजात हलगर्जीपणा केलेबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली होती. सदर नोटीसीचा खुलासा दिलेला आहे तो अमान्य करण्यात आलेला आहे.

वरील प्रकरणी श्री. एस. ए. बोराटे ग्रामपंचायत अधिकारी स्तंभ क्रमांक 3 नुसार चौकशी अहवालातील दप्तर तपासणीमधील ग्रामपंचायत बांगर्डे येथील कामकाज करताना दोषी आढळून आलेले आहेत. या सर्व बाबींचे अवलोकन करता श्री. एस. ए. बोराटे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत बांगर्डे माळशिरस यांच्या अनियमितता कामकाज व गैरवर्तनाबाबत मी गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस मला प्राप्त झालेल्या स्तंभ क्रमांक 1 मधील अधिकारानुसार स्तंभ क्रमांक 2 मधील तरतुदीनुसार स्तंभ 8 अन्वये मंजूर कार्यालयीन टिपणी व या कार्यालयाकडील आदेश क्रमांक 13 /02/2026 पासून जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात येत आहे..
तीन ते चार वर्षापासून ध्येयवेडी संघटना पाठपुरावा करीत होती. ध्येयवेडी संघटनेच्या लढ्याला यश आलेले असले तरीसुद्धा अजून लढा सुरूच राहणार असल्याचे ध्येयवेडी संघटनेच्या कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



