अखिल भारतीय माळी शिक्षण संस्थेला पाच लाख रुपये देणगी
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-02-15-at-07.45.49_84bed1b1-780x470.jpg)
माळी शिक्षण संस्थेचा मेळावा संपन्न
माळीनगर (बारामती झटका)
अखिल भारतीय माळी शिक्षण संस्थेची विश्वस्त, मध्यवर्ती कार्यकारिणी सभा व समाज बांधव मेळावा जुन्नर येथील लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट येथे दि. ११ फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाला. ही संस्था गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे व त्यांचा सर्वांगीण विकास करणे यासाठी काम करते. सभा व मेळावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून आलेल्या समाज बांधवांची राहण्याची, जेवणाची व सभेसाठी हॉल इत्यादी सर्व व्यवस्था लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळांनी केली होती. सर्वप्रथम विश्वस्त मंडळ मीटिंग त्यानंतर मध्यवर्ती कार्यकारीने मीटिंग व त्यानंतर समाज बांधव मेळावा पार पडला.
यावेळी सरचिटणीस प्रशांत एकतपुरे यांनी स्वागत करून उपस्थितांना संस्थेविषयी माहिती दिली व जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी संस्थेला आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद म्हणून मुंबई, कळवा येथील उद्योजक डी. के. बापू माळी यांनी यावेळी संस्थेला रुपये पाच लाख देणगी दिली. त्याबद्दल मुख्य विश्वस्त पद्मकांत कुदळे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले व सदर देणगीचा उपयोग अनेक गरजू होतकरू विद्यार्थ्यांना होणार असल्याचे कुदळे यांनी सांगितले. अध्यक्ष दिलीप राऊत यांनी लेण्याद्री ट्रस्टचे अध्यक्ष रामदास ढेकणे व विश्वस्त जितेंद्र बिडवाई व सर्व विश्वस्त यांनी सदर कार्यक्रमास सर्वतोपरी मदत केल्याबद्दल सर्वांचे शाल व श्रीफळ देऊन आभार मानले. तसेच हा मेळावा पार पाडण्यात विशेष योगदान दिल्याबद्दल डॉ. दत्तात्रय बाळसराफ व सौ. स्नेहलताई बाळसराफ तसेच दुसऱ्या दिवशीचे सर्वांची भोजन व्यवस्था केल्याबद्दल सत्यवान शेठ बाळसराफ यांचे विशेष आभार मानले.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-02-15-at-07.45.49_f4aaddbf-1024x794.jpg)
![](http://baramatizatka.com/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-01-02-at-16.37.28_5e21f368.jpg)
यावेळी खजिनदार विजय लोणकर, विश्वस्त नीलिमा सोनवणे नाशिक, प्रकाश लोंढे पुणे, विश्वनाथ भालिंगे मुंबई, मोतीलाल महाजन जळगाव, संपतराव शिंदे फलटण, रवी चौधरी पुणे, तसेच उपाध्यक्ष हिरामण बच्छाव कल्याण, दिलीप करपे पुणे, विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन धरणगाव, नितीन चौधरी मुंबई, भाऊसाहेब मंडलिक संगमनेर, सरिता नेरकर जळगाव, केशव यादव लातूर त्याचप्रमाणे कार्यकारिणी सदस्य राजीव सोनवणे धुळे, पंकज गिरमे, मनोज झगडे, विनोद बनकर, संजय राऊत, प्रितेश गवळी, नाना कुदळे, सुनिता क्षीरसागर, कैलास काटे, शारदा लडकत, सुधीर पैठणकर, सुजित मेहेर, पुंडलिक लव्हे, नूतन शिवरकर, नंदकुमार लडकत आदी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.