ताज्या बातम्या

अखिल भारतीय मराठा महासंघ व सकल मराठा समाजाच्या वतीने पंढरपूर येथे मराठा मेळावा व उद्योजकता मार्गदर्शन मेळावा

पंढरपूर (बारामती झटका)

पंढरपूर अखिल भारतीय मराठा महासंघ सोलापूर जिल्हा, पंढरपूर शहर व तालुका तसेच सकल मराठा समाज यांच्यावतीने पंढरपूर येथे रविवार दि. 22/09/2024 रोजी सकाळी 10:30 वा. मोरारजी कानजी धर्मशाळा स्टेशन रोड, पंढरपूर या ठिकाणी मराठा समाजातील तरुण उद्योजकांसाठी मार्गदर्शन शिबिर व मराठा मेळावा आयोजित केलेला आहे.

सदर मेळाव्यास अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष तसेच कै. आमदार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) मा. आ. नरेंद्र अण्णासाहेब पाटील साहेब हे उपस्थित राहणार असून ते नवीन तरुण उद्योजक तसेच मराठा बांधव यांच्याबरोबर संवाद साधणार आहेत. आजपर्यंत एक लाख उद्योजक घडवलेले आहेत. आता पाच लाख उद्योजक घडवण्याचा टप्पा जवळ आला आहे. तेव्हा मराठा बांधवांनी याचा लाभ घ्यावा.

तसेच सदर मेळाव्यामध्ये मराठा आरक्षण, त्याचबरोबर पंढरपूर येथे कै. आमदार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कार्यालय चालू करणे बाबत, तसेच मराठा उद्योजक मेळावा, ऑफिस उद्घाटन समारंभ व मराठा उद्योजक लाभार्थ्यांचा सत्कार समारंभ या विषयावर विचार विनिमय करण्यात येणार आहे. तरी मराठा समाजातील सर्व तरुण बांधवांनी व भगिनींनी आणि नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. अर्जुनराव चव्हाण यांनी केले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button