अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शाखेचे उद्घाटन- अर्जुनराव चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न

सोलापुर (बारामती झटका)
अखिल भारतीय मराठा महासंघ सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री. अर्जुनराव चव्हाण यांच्या शुभहस्ते लक्ष्मी नगर, लक्ष्मी टाकळी येथे अखिल भारतीय युवक मराठा महासंघ या शाखेचे उद्घाटन मंगळवार दि. 27/08/2024 रोजी संपन्न झाले.
यावेळी अर्जुनराव चव्हाण यांनी एक लाख युवा उद्योजक आतापर्यंत घडलेले असून इथून पुढे दोन लाख उद्योजक कसे घडतील, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. त्यामध्ये सहभाग घ्यावा तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या योजनेचा फायदा जास्तीत जास्त मराठा युवकांनी घ्यावा. सारथी सारख्या शैक्षणिक योजनेचा लाभ घ्यावा. महिलांनीही पाठीमागे न राहता आपला नवीन उद्योग सुरू करावा. आपले समाज बांधव कसे उद्योजक बनतील याकडे लक्ष द्यावे. यासाठी मी तुमच्यासोबत आहे, असे मनोगत व्यक्त केले.


त्यानंतर जिल्हा सचिव देठे सर, तालुका अध्यक्ष संतोष जाधव व इतर काहींनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष श्री. सचिनराव गंगथडे, जिल्हा सचिव श्री. देठे सर, युवक जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजीराव मोरे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष श्री. हनुमंत कदम सर, तालुका अध्यक्ष संतोष नाना जाधव, सोलापूर जिल्हा रिक्षा संघटना अध्यक्ष श्री. नागेश गायकवाड तसेच जिल्हा परिषद सदस्य रामदास ढोणे, ग्रामपंचायत सदस्य औदुंबर ढोणे, प्रगतशील द्राक्ष बागायतदार सुरेशजी टीकोरे, सोसायटीचे चेअरमन महादेव काशीद, गणेश ढोणे, विजय उकरंडे तसेच शाखाध्यक्ष सोमनाथ खपाले, उपाध्यक्ष मनोज मिसाळ, खजिनदार हनुमंत खपाले, संघटक बालाजी खंडाळकर, कार्याध्यक्ष प्रवीण खपाले, सचिव समाधान खपाले व इतर सर्व सदस्य, प्रतिष्ठित मंडळी या सर्वांच्या उपस्थितीत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.