ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

अकलूज मधील गाळेधारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, अन्याय होऊ देणार नाही – लोकप्रिय दमदार राम सातपुते..

प्रस्थापितांनी स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी गोरगरीब व सर्वसामान्य जनतेचे संसार उध्वस्त करू नये, जुलमी राजवट उध्वस्त करू, जनतेच्या संतप्त प्रतिक्रिया…

अकलूज (बारामती झटका)

अकलूज माळेवाडी नगरपंचायत हद्दीत तत्कालीन अकलूज ग्रामपंचायत, शिक्षण संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ अशा अनेक छोट्या-मोठ्या सहकारी संस्थांनी अकलूज येथे गाळेधारकांना गाळे उद्योग-व्यवसाय करण्याकरता भाडेतत्त्वावर दिलेले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत अकलूज व अकलूज परिसरातील गावांमधून भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे तत्कालीन लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना महायुतीचे अधिकृत उमेदवार असताना मताधिक्य वाढल्याने राजकीय आकसापोटी अकलूज मधील गाळेधारकांना विनाकारण त्रास देण्याच्या हेतूने व कोणतीही पूर्व सूचना न देता गाळे खाली करण्याची कर्मचाऱ्यांमार्फत सुरू असलेली जुलमी राजवट थांबविण्यासाठी अकलूज मधील गाळेधारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी ठोस भूमिका लोकप्रिय दमदार राम सातपुते यांनी घेतलेली आहे.

भारतीय जनता पक्षाचे विधानसभेला काम केले म्हणून जर अकलूज मधील प्रस्थापित गाळेधारक व गोरगरीब जनतेला वेठीस धरत असतील तर त्यांची जागा त्यांना दाखवून गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार, वेळप्रसंगी गाळेधारक यांच्या समवेत आंदोलन, मोर्चा काढण्याची वेळ आली तरी खंबीरपणे गाळेधारकांच्या पाठीशी उभा राहणार असल्याची भूमिका भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी घेतलेली आहे.

वास्तविक पाहता कोणत्याही भाडेकरूला अथवा गाळेधारकांना गाळा खाली करण्यासाठी काहीतरी ठोस कारण किंवा पूर्वसूचना द्यावी लागते. कितीतरी दिवसांपासून गाळेधारकांनी आपला व्यवसाय त्यामध्ये उभा केलेला असतो. वेळेवर भाडे सुरू असते, तरीसुद्धा प्रस्थापित स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी गोरगरीब व सर्वसामान्य जनतेचे संसार उध्वस्त करून त्यांच्या चुलीमध्ये जर पाणी ओतत असतील तर जुलमी राजवट उध्वस्त करण्याच्या संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्य व गोरगरीब गाळेधारक जनतेमधून उमटत आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button