ताज्या बातम्याराजकारण

सागर बंगला मुंबई येथे जय मल्हार क्रांती संघटनेची बैठक केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी ना. श्री. भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत संपन्न….

विधान परिषदेचे आमदार श्रीकांतजी भारतीय यांची माळशिरस तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची राजकीय खलबते…

मुंबई (बारामती झटका)

केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी ना. श्री. भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सागर बंगला येथे जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे, उपाध्यक्ष अंकुशराव जाधव सर, जय मल्हार क्रांती संघटनेचे कोर कमिटी सदस्य अग्निनाथ चव्हाण, जय मल्हार क्रांती संघटना युवक उपाध्यक्ष ॲड. विठ्ठल मंडले, जय मल्हार क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित शिरतोडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळासाहेब चव्हाण, शामराव मंडले यांच्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जय मल्हार क्रांती संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगामी विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात महाराष्ट्राचे प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांची जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा दौलत नाना शितोळे यांच्यासह कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधण्यात आला.

विधान परिषदेचे आमदार श्रीकांतजी भारतीय यांची आग्नीनाथ चव्हाण, ॲड. विठ्ठल मंडले, शामराव मंडले यांनी माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीविषयी सखोल चर्चा करण्यात आली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button