अकलूज परिसरात भाजप न वाढण्याचे प्रमुख कारण पक्षाचे कार्यालय नाही…

भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या मालकीचे कार्यालय सुरू केल्यानंतर जनतेचा जनसंपर्क वाढला जाणार….
अकलूज (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात, राज्यात आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या विचाराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती आहेत. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात दिवसेंदिवस पक्षाची ताकद वाढत आहे. पूर्व भागात पूर्व उत्तर मध्ये भाजप पक्ष उभारी घेत आहे. मात्र, पूर्व उत्तर म्हणजेच अकलूज परिसरात भारतीय जनता पक्षाची ताकद म्हणावी अशी वाढलेली नाही. त्यामध्ये अनेक कारणे आहेत. त्यापैकी अकलूज परिसरात भाजपचे स्वतःचे कार्यालय नाही.
भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, अडीअडचणी सांगता येत नाही. पक्षाचे स्वतंत्र कार्यालय असल्यानंतर जनतेचा संपर्क वाढेल, व्यक्तिगत व सार्वजनिक अडचणीची सोडवणूक होईल. व्यावसायिक कार्यालयामध्ये सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला मनमोकळेपणाने बोलता व भेटता येत नाही. स्वतःची गार्हानी दुसऱ्याच्या दारात सांगू वाटत नाही.

यासाठी भारतीय जनता पार्टीने पक्ष वाढवायचा असेल तर स्वतःच्या मालकीचे अकलूज परिसरात कार्यालय सुरू करावे, अशी सर्वसामान्य गोरगरीब व पिडीत निष्ठावान कार्यकर्त्यांची मागणी आहे..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



