अकलूज पोलीसांनी तब्बल 18,30,800 रू. किंमतीचे सोने, चांदीच्या दागिन्यांसह किंमती मुद्देमाल मूळ फिर्यादीस केला परत

अकलूज (बारामती झटका)
अकलूज पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमीदार, तपास कौशल्य, सीसीटिव्ही बाबत तपास करून वेगवेगळ्या गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असे तब्बल 18,30,800/- रूपये किंमतीचे रोख रक्कम व सोने, चांदीचे दागिने गुन्ह्याचे फिर्यादीस / मूळ मालकास परत केलेले आहेत. त्याचे वर्णन खालीलप्रमाणे….!
1) गु.र.नं. 46/2012 भा.दं.वि. कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील 8,000/- रोख रक्कम,
2) गु.र.नं. 86/2015 भा.दं.वि. कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील 60,000/- रुपये कि. चे 191.24 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने.
3) गु.र.नं. 43/2015 भा.दं. वि. कलम 380 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील 1) 3,300/- रुपये रोख रक्कम
4) गु.र.नं. 564/2017 भा.दं. वि. कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील 500/- रुपये रोख रक्कम
5) गु.र.नं. 181/2024 भा.दं. वि. कलम 380 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील 65,000/- रुपये कि.ची 05 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व 50 ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजन
6) गु.र.नं. 43/2023 भा.दं. वि. कलम 380 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील 66,000/- रुपये किमतीची 05 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व 05 ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ
7) गु.र.नं. 200/2024 भा.दं. वि. कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील 30,000/- रूपये किंमतीचे 05 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र

8) गु.र.नं. 521/2025 बी. एन. एस कलम 306 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील 1,26,000/- रूपये किंमतीचे 1) 13.540 ग्रम वजनाचे सोन्याचे गंठण 2) 5 ग्रम वजनाची सोन्याची लेडीज अंगठी
9) गु.र.नं. 378/2025 बी.एन.एस कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील 27,000/- रूपये किंमतीचे 1) 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र 2) 2 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी
10) गु.र.नं.545/2025 बी. एन. एस कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील 9,50,000/- रूपये किंमतीचे 1)35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण 2)64 ग्रॅम वजनाच्या सोन्याचा 02 बांगड्या व सोन्याची 01 पाटली
11) गु.र.नं.91/2025 बी. एन. एस कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील 90,000/- रूपये किंमतीचे 01 तोळा वजनाचे सोन्याचे डोरले
12) गु.र.नं.388/2025 बी. एन. एस कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील 2,20,000/- रूपये किंमतीचे 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे साखळीतील गंठण
13) गु.र.नं.317/2025 बी. एन. एस कलम 305 (अ), 331(4),317 (2), 3 (5) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील 1,85,000/- रूपये किंमतीचे 1)15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण 2)5 ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफूले 3) चांदीचे पैंजण, जोडवी व करंडा
असे एकूण 18,30,800/- रूपये किंमतीचे वेगवेगळ्या गुन्ह्यातील सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा वरील मुद्देमाल सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल कुलकर्णी सो., अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. प्रितम यावलकर सो., अकलूज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. नारायण शिरगांवकर सो. यांच्या मार्गदर्शनाखाली अकलून पोलीस ठाण्यास वरील सर्व गुन्ह्यातील फिर्यादी व मूळ मालक यांना बोलावून घेऊन त्यांना सोन्याचे दागिने व रोख रक्कम परत करण्यात आली.

सदरवेळी अकलूज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. नारायण शिरगांवकर सो, अकलूज पोलीस ठाण्याचे पोलोस निरीक्षक श्री. निरज उबाळे, सहा. पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, सहा. पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जरे तसेच अकलूज उपविभागातील पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. विकास दिंडुरे, सहा. पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, सहा. पोलीस निरीक्षक विजय गोसावी व अकलूज पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार पो.हे.कों. सुहास क्षीरसागर, पो.हे.कों. विक्रम घाटगे, पो.हे.कों. शिवकुमार मदभावी, पो.र्को. सोमनाथ माने, पो.कों. मोहन मस्के हे हजर होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



