अकलूज रोटरी क्लबला मिळाली दहा पारितोषिक

रोटरीचा वार्षिक सोहळा; मुलींचे शिक्षणात योगदान तर सीए नितीन कुदळे यांना बेस्ट डिस्ट्रिक्ट डायरेक्टर अवार्ड
अकलुज (बारामती झटका)
रोटरी क्लब ऑफ अकलूज यांनी गत वर्षांमध्ये मुलींच्या शिक्षणामध्ये मोठे योगदान केल्याबद्दल तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल अकलूज रोटरी क्लबला दहा पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. रोटरी क्लब अकलूजला गर्ल्स एज्युकेशन ट्रॉफी तर सीए नितीन कुदळे यांना बेस्ट डिस्ट्रिक्ट डायरेक्टर अवॉर्ड प्राप्त झाले आहे.
रोटरी क्लबचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पाचगणी येथे संपन्न झाला. मागील वर्ष २०२३-२४ मध्ये झालेल्या कार्याचा आढावा घेऊन डिस्ट्रिक्ट अवॉर्ड्स सेरेमनी झाला. त्यामध्ये रोटरी क्लब अकलूजद्वारे सीएसआर मधून डिस्ट्रिक्टमधील विविध क्लबच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळामधील मुलींसाठी सायकल प्रोजेक्ट राबविला होता. त्यासाठी गर्ल्स एज्युकेशन ट्रॉफी देऊन रोटरी क्लब अकलूजला सन्मानित करण्यात आले तर दि रोटरी फाऊंडेशन हया विभागाचे डायरेक्टर म्हणून सीए नितीन कुदळे यांनी डिस्ट्रिक्ट ३१३२ मध्ये नवीन उच्चांक निर्माण केले. त्याची नोंद घेत बेस्ट डिस्ट्रिक्ट डायरेक्टर अवॉर्ड त्यांना देण्यात आलले. त्याचबरोबर रोटरी क्लब अकलूजला स्पोर्ट्स, इतर डिस्ट्रिक्ट बरोबर जॉइंट प्रकल्प असे विविध १० अवॉर्ड्स मिळाले. त्यासाठी रोटरी वर्ष २०१३-२४ चे अध्यक्ष ओजस दोभाडा, सचिव – कल्पेश पांढरे आणि सर्व रोटरी क्लब अकलूजच्या सदस्यांचे अभिनंदन होत आहे. पाचगणी येथील कार्यक्रमासाठी ओजस दोभाडा, कल्पेश पांढरे, ॲड. प्रविण कारंडे, ॲड. दिपक फडे, नवनाथ नागणे, सीए. नितीन कुदळे, केतन बोरवके, मनीष गायकवाड, पोपट पाटील, अजित वीर, हनुमंत सुरवसे आदी उपस्थित होते.

या उपक्रमासाठी पारितोषिक
रोटरी क्लब अकलूज यांना बेस्ट प्रोजेक्ट ऑन गर्ल एज्युकेशन फर्स्ट प्राइस, बेस्ट डायरेक्टर सीए नितीन कुदळे फर्स्ट प्राइस, जॉईंट प्रोजेक्ट विथ अदर डिस्ट्रिक फर्स्ट प्राइस, डायमंड क्लब, सीएसआर ग्रँड, गोल्डन क्लब, स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज, प्रोजेक्ट दृष्टी, अशी विविध १० पारितोषिके प्राप्त झाली आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.