ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

अकलूज शहर भाजप अध्यक्ष महादेवराव कावळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

माळीनगर (बारामती झटका)

माणुसकीतला माणुसपण जपणारा, गोरगरिबांच्या मदतीला धावणारा, लोकांच्या अडचणीच्या काळात खंबीरपणे पाठीशी उभारणारे अकलूज भारतीय जनता पक्षाचे नूतन शहराध्यक्ष महादेवराव कावळे यांचा ४२ वा वाढदिवस विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांचा सत्कार करण्यासाठी माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रामबाग गृह संकुलामधील त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती.

सकाळी त्यांच्या निवासस्थानी महादेवराव कावळे यांना पत्नी व मुलींनी औक्षण केले. त्यानंतर डॉ. निलेश ननवरे, नवनाथ साठे, भाऊ गुळवे, नाना महानवर, लहु कांबळे व संजय खुडे यांनी फेटा, शाल, श्रीफळ व गुलाबगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दुपारी रमामाता चौक येथे गरीब कुटुंबातील लोकांना पन्हाळी पत्र्याचे वाटप माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते पत्र्याचे वाटप करण्यात आले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गरीब कुटुंबीयांना पत्र्याचे वाटप केल्यामुळे त्यांच्यातून समाधानाचे वातावरण पसरले आहे.

यावेळी भाजप नेते नागेश वाघमोडे, सोलापूर जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सदस्य अशोकराव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अकलूज शहराध्यक्ष राजीव गायकवाड, दिपक खंडागळे, उमेश जाधव, सचिन शिंदे, सचिन घोडके, सिध्दार्थ गायकवाड, अमित टिळेकर, महेश घाडगे, अमर खंडागळे, ओंकार चंदनशिवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button