अकलूज येथे धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर एक युग या चित्रपटाचा प्रमोशन सोहळा व भव्य डान्स शो व बक्षीस वितरण समारंभ होणार

अकलूज (बारामती झटका)
अकलूज, ता. माळशिरस येथे लयभारी प्रॉडक्शन निर्मित आगामी चित्रपट धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर एक युग या चित्रपटाचा प्रमोशन सोहळा व साई सहारा एज्युकेशनल अकॅडमी अकलूज व कलामुर्ती डान्स अकॅडमी अकलूज आयोजित भव्य उन्हाळा नृत्य प्रशिक्षण सांगता समारंभ व भव्य डान्स शो व बक्षीस वितरण या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दि. २१/५/२०२५ रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत स्मृतीभवन अकलूज, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन चित्रपट निर्माते सोमनाथ शिंदे, चित्रपट लेखक व दिग्दर्शक सुशांत सोनवले, निर्माते, अभिनेता व अनुभवी कोरिओग्राफर कलामूर्ती डान्स अकॅडमी अकलूजचे प्रताप थोरात सर यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील कार्याध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज व माजी जिल्हा परिषद सदस्या, रेडिओलॉजिस्ट डॉ. मानसी इनामदार, स्त्री रोग तज्ञ डॉ. कविता कांबळे या असणार आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर चित्रपटातील अभिनेत्री अश्विनी महांगडे व या चित्रपटाची संपूर्ण टीम असणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता व व्याख्याते राहुल पी. एन. राजे हे करणार आहेत.
सदर कार्यक्रमामध्ये कलामूर्ती डान्स अकॅडमी मधील गुणवंत विद्यार्थी त्रिशा शिंदे, अदिती भगत, धैर्यलक्ष्मी एकतपुरे, ऋतुजा घुले आणि श्रावणी राचकर यांचा डान्स परफॉर्मन्स हे या कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहे. तसेच यावेळी प्रोफेशनल डान्स कोरिओग्राफर सुशील गायकवाड डान्स डी. जोडी आंध्र प्रदेश, अक्षय जगताप बेस्ट डान्सर व फिटनेस ट्रेनर टेंभुर्णी, भूमिका पाडुळे कथ्थक डांसर, पूजा क्षीरसागर भरतनाट्यम विशारद, आसावरी देवकुळे अकलूज, रोहित वाघमारे अकलूज यांचा सत्कार व डान्स होणार आहे.

तरी या कार्यक्रमास रसिक प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रद्धा जवंजाळ अध्यक्षा, सहारा इन्स्टिट्यूट अकलूज आणि श्री. राहुल जवंजाळ सेक्रेटरी, सहारा इन्स्टिट्यूट अकलूज यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.