ताज्या बातम्यासामाजिक

अकलूज येथे कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

अकलूज (बारामती झटका)

अकलूज ता. माळशिरस येथे माळशिरस तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती कर्मवीर कै. मारुतराव उर्फ बाबासाहेब आनंदराव माने पाटील यांची १११ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

संत तुकाराम महाराज बीजेदिवशी कै. बाबासाहेब माने पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने जयंती समारंभ समिती श्री साईबाबा सेवा ट्रस्ट, लोकमान्य गणेशोत्सव मंडळ, शिवरत्न गणेशोत्सव मंडळ व अकलूज नगर परिषद यांच्या वतीने आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विजय चौकातील पुर्णाकृती पुतळ्यास महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, हंसराज माने पाटील, सुजयसिंह माने पाटील, सौ. देवन्यादेवी शिवतेजसिंह मोहिते पाटील, सौ. युगंधरादेवी क्रांतीसिंह माने पाटील, मुख्याधिकारी दयानंद गोरे, उत्तमराव माने, तात्या गुळवे माजी सरपंच, विठ्ठलराव गायकवाड, विशाल मोरे, विशाल फुले, राहूल जगताप, पत्रकार भारत मगर, पत्रकार संजय लोहकरे, उत्कर्ष शेटे, चंद्रकांत भोसले, शिवरत्न गणेश मंडळ, लोकमान्य गणेश मंडळ, श्री साईबाबा सेवा ट्रस्टचे सर्व सदस्य यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button