जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह. भ. प. बापूसाहेब महाराज देहूकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार…

ह. भ. प. श्री. हरिश्चंद्र तुकाराम जाधव यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा व सौ. प्रमिला हरिश्चंद्र जाधव यांचा अमृत महोत्सव सोहळा वडाचा मळा, मळोली येथे संपन्न होणार…
मळोली (बारामती झटका)
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज श्री गुरु ह. भ. प. बापूसाहेब महाराज देहूकर यांचे शनिवार दि. 25/10/2025 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये ह. भ. प. हरिश्चंद्र तुकाराम जाधव यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा व सौ. प्रमिला हरिश्चंद्र जाधव यांचा अमृतमहोत्सव, अभिष्टचिंतन सोहळा निमित्त सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन केलेले आहे.
ह. भ. प. हरिश्चंद्र तुकाराम जाधव यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा व सौ. प्रमिला हरिश्चंद्र जाधव यांचा अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त किर्तन व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी मित्रपरिवार नातेवाईक व समस्त ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे, असे जाधव परिवार यांच्याकडून नम्र आवाहन करण्यात येत आहे.
मळोली गावातील सांप्रदायिक घराणं श्री. तुकाराम जाधव व काशीबाई जाधव यांना हरिश्चंद्र वासुदेव व नामदेव अशी तीन मुलं व गोपिका चव्हाण एक मुलगी असा परिवार होता. सांप्रदायिक घराणे असल्याने लहानपणापासून स्नेहाभक्ती आपुलकी एकोपा असे सुंदर नाते जपण्याची लहानपणापासूनच घरातून संस्कार आलेले आहेत. आजसुद्धा जाधव परिवार यांच्यामध्ये एकोप्याचे सुंदर नाते टिकून आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे वंशज मळोली येथे सातव्या पिढीपासून वास्तव्यास आहेत. ह. भ. प. हरिचंद्र जाधव हे 60 वर्ष देहुकर फडाचे विणकेरी राहिलेले आहेत. ह. भ. प. हरिश्चंद्र जाधव यांचा रानंद येथील गोविंद शिंदे यांच्या घराण्यातील प्रमिला यांच्याशी 1966 साली विवाह झालेला आहे. प्रमिला यांना सुद्धा माहेर व सासर या ठिकाणी अध्यात्माचा वारसा असल्याने त्यांनीही माहेरच्या संस्काराची शिदोरी सासरच्या घरीसुद्धा चांगल्या पद्धतीने घेवून आपल्या आई-वडिलांच्या संस्काराने जाधव परिवारांमध्ये मोठ्या सुनेची भूमिका चांगल्या पद्धतीने सांभाळलेली आहे.

हरिश्चंद्र जाधव व प्रमिला जाधव या दाम्पत्यांना मुकुंद व प्रशांत दोन मुले आहेत तर संगीता राजेंद्र माने देशमुख कन्या आहे. जाधव परिवार यांनी अध्यात्म बरोबर शिक्षणामध्ये सुद्धा उत्तुंग भरारी घेतलेली आहे. श्री. मुकुंद व सौ. उज्वला यांच्या शिवांजली ही कन्या एमटेक फार्मा भुवनेश्वर येथे शिक्षण घेत आहे तर श्री. प्रशांत व सौ. सारीका यांची कन्या राजनंदिनी आयआयटी भिलाई येथे शिक्षण घेत आहे. तर पुत्र राजवीर सीबीएससी मधून इयत्ता नववी मध्ये शिकत आहे.
ह. भ. प. हरिचंद्र जाधव यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा व सौ. प्रमिला जाधव यांचा अमृत महोत्सव सोहळा उभय पती-पत्नी यांच्या आयुष्यातील संघर्षमय व सुवर्णकाळ प्रवास झालेला आहे. त्यांच्या कार्याचा गुणगौरव व्हावा व मित्रपरिवार, नातेवाईक यांना नामकीर्तन, भजन आणि महाप्रसादाचे आयोजन करून सदरच्या कार्यक्रमांमध्ये वारकरी सांप्रदाय क्षेत्रातील मान्यवर संतप्रेमी, मित्रपरिवार, नातेवाईक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदरचा सोहळा आनंदमय व भक्तिमय वातावरणामध्ये साजरा होण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपल्या आगमनाने संपूर्ण परिसर भक्तीचा आनंदाचा महापर्व होणार आहे. यासाठी आपण सर्वांनी उपस्थित रहावे, असे जाधव परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



