अकलूज येथे महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी व विक्री संघटनेच्या ५ व्या वर्धापन दिनाचे आयोजन
अकलूज (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी व विक्री संघटना संस्थापक अध्यक्ष अशोक काका जोशी व महाराष्ट्र अध्यक्ष संतोष शेठ कोठारी साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे सुरु आहे. येत्या शनिवार दि. ०७/१२/२०२४ रोजी संघटनेला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. संघटनेच्या ५ व्या वर्धापन दिनाचे आयोजन शनिवार दि. ०७/१२/२०२४ रोजी दु. १ वा. सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ तरंगे यांच्या अक्षय कार बाजार, अकलूज ता. माळशिरस या ठिकाणी करण्यात आले आहे.
तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजनही करण्यात आले आहे. यावेळी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
तरी सर्व सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी, डीलर, एजंट, सभासद सर्वांनी उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती, सुरेशभाऊ तरंगे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष यांच्यावतीने करण्यात आली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/