अकलूज येथे महर्षी चौकात महाराष्ट्र राज्य योद्धा फाउंडेशनचा ‘याराना फलक’ लक्ष वेधून घेत आहे…

पाणीदार खासदार व ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे यांचे फोटो महर्षी चौकाचे आकर्षण ठरले…
अकलूज (बारामती झटका)
महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीच्या मंत्रिमंडळात 33 कॅबिनेट व 06 राज्यमंत्री यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. त्यामध्ये माण-खटावचे चौकार आमदार जयाभाऊ उर्फ जयकुमार गोरे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील महर्षी चौकातील महाराष्ट्र राज्य योद्धा फाउंडेशनचा ‘याराना फलक’ लक्ष वेधून घेत आहे. सदरच्या फलकावर माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर व कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्या बॅनरवरील फोटो महर्षी चौकाचे आकर्षण ठरलेले आहे.
महर्षी चौकाच्या बाजूलाच नवीन एसटी स्टँड आहे. जवळच प्रांत कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज पोलीस स्टेशन अशी अनेक महत्त्वाची कार्यालय असल्याने महर्षी चौकात वाहनधारक व कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचा दैनंदिन संपर्क असतो. सदरच्या चौकातून शंकरनगर कडे जाणारा रस्ता आहे. इंदापूर बायपासकडे जाणारा रस्ता तसेच सदाभाऊ चौक व प्रतापसिंह चौकातून वेळापूरकडे जाणारा रस्ता असल्याने या चौकात कायम वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करण्याऱ्या लोकांचे या दोघांचा याराना फलक लक्ष वेधून घेत आहे. खऱ्या अर्थाने पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व चौकार आमदार जयाभाऊ गोरे यांची मैत्री महाराष्ट्राला माहित आहे. ती अकलूजकरांना सुद्धा माहिती व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य योद्धा फाउंडेशन यांनी याराना फलक लावून लक्ष वेधून घेतलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.