अकलूज येथे मराठा सेवा संघ महाअधिवेशन २०२५ चे आयोजन…

अकलूज (बारामती झटका)
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, ३३ कक्ष महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा सेवा संघ महाअधिवेशन २०२५ चे आयोजन दि. १०, ११, १२ मे २०२५ रोजी श्री. शंकरराव मोहिते पाटील स्मृती भवन, शंकरनगर, अकलूज, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे.
या तीन दिवसीय महाअधिवेशनात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व साहित्यिक सत्रांसह विविध विषयांवर सखोल चर्चा, नामवंत वक्त्यांची व्याख्याने, साहित्यिक सत्रे, समाजोपयोगी विषयांवरील मार्गदर्शन, तसेच कला, क्रीडा, महिला व युवकांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
त्यामध्ये शनिवार दि. १० मे २०२५ रोजी सकाळी ११ ते १ मराठा सेवा संघ व ३३ कक्ष बळकटीकरण व पुर्नबांधणी (इच्छूकांचे अर्ज स्विकृती) या विषयावर शिवश्री इंजि. पुरुषोत्तम खेडेकर (संस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा संघ) मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे समन्वयक शिवश्री सोमनाथ लडके (कार्यालयीन सचिव, मराठा सेवा संघ) हे आहेत तर शिवश्री धनंजय पाटील (विभागीय अध्यक्ष) यांचा सहयोग असणार आहे. दुपारी १.०० ते २.०० जेवण असणार आहे. दुपारी २ ते ५.३० मा. विजयसिंह मोहिते-पाटील (माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र) यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी अध्यक्ष शिवश्री इंजि. डॉ. विजय घोगरे (प्रदेश अध्यक्ष, मराठा सेवा संघ) हे आहेत तर, स्वागताध्यक्ष मा. मदनसिंह मोहिते-पाटील (मा. अध्यक्ष, जि. प. सोलापूर, सभापती कृ. उ. बा. अकलूज) हे असणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थितीत शिवश्री निर्मलकुमार देशमुख (संस्थापक सचिव, म.से.संघ), शिवश्री कामाजी पवार (अध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणी.म. से. संघ), शिवश्री नेताजी गोरे (जेष्ठ मार्गदर्शक, म.से. संघ), शिवश्री नवनाथराव घाडगे (प्रदेश कार्याध्यक्ष, म.से.संघ), शिवश्री मधुकरराव मेहेकरे (अध्यक्ष, जिजाऊसृष्टी सिंदखेड राजा), शिवमती सिमाताई बोके (प्रदेशाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड), शिवश्री प्रा. अर्जुनराव तनपुरे (ज्येष्ठ मार्गदर्शक.म.से.संघ), शिवश्री डॉ. विलास पाटील (प्रदेशाध्यक्ष, वा. सि.बेद्रे इतिहास परिषद), शिवश्री इंजि. विजयकुमार ठुबे (ज्येष्ठ मार्गदर्शक.म.से. संघ), शिवश्री प्रभाकर झोड (प्रदेशाध्यक्ष. शिक्षण परिषद), शिवश्री मनोज आखरे (प्रदेश अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड), शिवश्री राजेंद्रसिंह पाटील (प्रदेशाध्यक्ष, मराठा उद्योजक परिषद) आदी मान्यवर असणार आहेत. दुपारी २.०० ते २.३० शिवशाहीर राजेंद्र कांबळे, खुडुसकर यांचा शाहीरी पोवाडा कार्यक्रम होणार आहे. दुपारी २.३० ते ३.०० अकलूज इतिहास व विकास (डॉक्यूमेंट्री) दाखविण्यात येणार आहे. दुपारी ३.०० ते ३.३० महाराणी येसूबाई यांच्या जीवनावरील एकपात्री प्रयोग “श्री राज्ञी सखी जयति” शिवमती आशा मोरजकर, परंडा या सादर करणार आहेत. यावेळी शिवश्री विठ्ठल भुसारे (जिल्हाध्यक्ष, म.से. संघ परभणी), शिवश्री कांतराव काका देशमुख (स्वागताध्यक्ष) व सर्व सहकारी यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. दु. ३.३० ते ५.३० उद्घाटन समारोह व मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. सायंकाळी ५.३० ते ७.३० संस्कृती यात्रा असणार आहे. यावेळी शिवमती सिमाताई बोके (प्रदेशाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड, महाराष्ट्र) अध्यक्षा व सर्व पदाधिकारी जिजाऊ ब्रिगेड, सोलापूर व पंढरपूर विभाग सोलापूर जिल्हा हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. याविषयीच्या अधिक माहितीसाठी शिवमती वैशाली कडू, शिवमती राधा कडवकर, शिवमती आक्काताई माने ४) शिवमती सरोज देशमुख यांच्याशी संपर्क साधावा. रात्री ७.३० ते ८.३० जेवण असणार आहे. रात्री ८:३० ते ११.०० “जागर विचारांचा, जागर संस्कृतीचा” सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी समन्वयक शिवमती सिमाताई बोके (प्रदेशाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड, महाराष्ट्र), शिवमती ज्योतीताई जाधव (प्रदेश महासचिव, नामदेव तुकाराम वारकरी परिषद) हे असणार आहेत.
रविवार दि. ११ मे २०२५ रोजी सकाळी ६.३० ते ८.०० सूर्योदयाच्या कविता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी समन्वयक शिवश्री डॉ. सतीश तराळ (प्रदेशाध्यक्ष जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद, महाराष्ट्र) हे असणार आहेत. सकाळी ८.०० ते ९.३० चहापान / नाष्टा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९.३० ते १०.१५ शिवश्री प्रा. प्रेमकुमार बोके, अंजनगाव सुर्जी यांचे इतिहासाचार्य मा. म. देशमुख बहुजन इतिहास व प्रबोधनाचे अर्ध्वयू या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी शिवश्री इंजी. मधुकरराव मेहकरे, नागपूर हे असणार आहेत. स. १०.१५ ते ११.०० विशेष व्याख्यान प्रा. विद्यापंडित कॉ. शरद पाटील यांची इतिहास मिमांसा आणि मार्क्स, फुले, आंबेडकरवाद यांचे असणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी शिवश्री सुरेंद्र पाटील, जळगांव (राज्य उपाध्यक्ष म.से.सं.) हे असणार आहेत. सकाळी ११.०० ते १.३० बहुजन चळवळींचा समन्वय आवश्यकता आणि कृती कार्यक्रमा अंतर्गत प्राचार्य डॉ. दिलीप चौधरी, चंद्रपूर यांचे बीजभाषण होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी शिवश्री इंजि. अरविंद गावंडे, अमरावती हे असणार आहेत. शिवश्री शालिग्राम मालकर, प्रदेशाध्यक्ष महा. माळी म. संघ, शिवश्री हसीब नदाफ, प्रदेश उपाध्यक्ष मौलाना आझाद वि.मं., शिवश्री युवराज पवार, अध्यक्ष जो.शा.बा. संघटना, शिवश्री तुकाराम बनसोडे, जिल्हा अध्यक्ष बुध्दीष्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि इतर बहुजन संघटनांचे पदाधिकारी यांचा सहभाग असणार आहे. दुपारी १.३० ते २.३० जेवण असणार आहे. दुपारी २.३० ते ३.१५ व्याख्याते डॉ. अशोक राणा, यवतमाळ (प्रसिद्ध भाषा व इतिहास अभ्यासक) यांचे मराठा इतिहास आणि व्देषाचे राजकारण या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तर यावेळी अध्यक्षस्थानी शिवश्री विठ्ठल भूसारे, परभणी (अध्यक्ष म से संघ परभणी) हे असणार आहेत. दुपारी ३.१५ ते ४.०० व्याख्याते डॉ. सतिश तराळ (अमरावती) (अध्यक्ष ज.तु.सा.प. महाराष्ट्र) यांचे मराठा समाजाच्या सांस्कृतिकरणाची आवश्यकता या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्षस्थानी शिवश्री डॉ. राजीव चव्हाण, गारगोटी (प्रदेशाध्यक्ष सा.स.आ.सा. विश्व शाहीर परिषद) हे असणार आहेत. दु. ४ ते ४.४५ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जीवन जगा आनंदाने, जीवन जगा मनसोक्त या विषयावर शिवश्री संजय कळमकर, अहिल्यानगर (सुप्रसिद्ध प्रेरक वक्ते) यांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायं ५ ते ५.४५ प्रबोधनाची देशियता आणि वैश्विकता या विषयावर व्याख्याते शिवश्री प्रा.डॉ. शरद बविस्कर (फ्रेंच साहित्य आणि तत्वज्ञान विभाग, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, दिल्ली) यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्षस्थानी शिवश्री प्रा. अशोक पवार, अमळनेर हे असणार आहेत. सायं. ५.४५ ते ६.३० व्याख्याते शिवश्री विजय चोरमारे (लेखक, कवी, पत्रकार, संपादक) यांचे माध्यम जगत आणि मराठा समाज या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्षस्थानी शिवश्री नेताजी गोरे (ज्येष्ठ मार्गदर्शक, माजी प्रदेशाध्यक्ष, म.से.सं.) हे असणार आहेत. सायंकाळी ६:३० ते ७.३० शिवश्री निर्मलकुमार देशमुख, मुंबई (संस्थापक सचिव म.से.संघ) यांचे आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि मराठा सेवा संघ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्षस्थानी इंजि विजयकुमार दुबे, (ज्येष्ठ मार्गदर्शक म.से.सं.) हे असणार आहेत. रात्री ७.३० ते ८.३० जेवण असणार आहे. रात्री ८.३० ते १०.३० : गझल महफिल आयोजित करण्यात आली आहे. यावेळी समन्वयक शिवश्री डॉ. सतीश तराळ हे असणार आहेत. तर शिवश्री नितीन देशमुख, वर्धा, शिवश्री डॉ. इकबाल शेख, छत्रपती संभाजी नगर, शिवश्री स्वप्निल चौधरी (सुत्रसंचालक), शिवमती सुहासिनी देशमुख, नांदेड व इतर मान्यवर गझलकार आदींचा सहभाग असणार आहे.
सोमवार दि. १२ मे २०२५ (बुध्दपौर्णिमा) रोजी सकाळी ६.३० ते ८.०० : नवोदित कवींचे काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी समन्वयक जगदगुरु तुकोबाराय साहित्य परिषद हे असणार आहेत तर अध्यक्षस्थानी रामप्रभु माने (बक्षीहिप्परगे, सोलापूर) हे असणार आहेत. सकाळी ८.०० ते ९.०० चहापान / नाष्टा असणार आहे. सकाळी ९.०० ते ११.३० परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी मराठा सेवा संघ व ३३ कक्ष पुर्नबांधणी कृती कार्यक्रम व अंमलबजावणी जिजाऊ रथ यात्रेचे अनुभव आणि फलश्रुती हा विषय आहे. यावेळी अध्यक्षस्थानी इंजि. नवनाथ घाडगे प्रदेश कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ हे असणार आहेत. तर, शिवमती सिमा बोके, प्रदेशाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड, अॅड. मनोज आखरे, प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, शिवमती ज्योती राजेजाधव, महासचिव, ना.तु. वारकरी परिषद, प्रा. अर्जुन तनपुरे मुख्य समन्वयक, जिजाऊ रथयात्रा, शिवश्री सौरभ खेडेकर, जिजाऊ रथयात्रा प्रमुख शिवश्री संदीपान जाधव अंबड, जि. जालना, शिवश्री डॉ मनोहर तुपकर, बुलढाणा यांचा सहभाग असणार आहे. सकाळी ११.३० ते १२.१५ नाचू किर्तनाचे रंगी या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्षस्थानी शिवश्री गंगाधर बनबरे, पुणे (प्रसिद्ध विचारवंत, संपादक) व शिवश्री भारत महाराज जाधव, पंढरपूर (कार्याध्यक्ष, ना.तु. वारकरी परिषद) हे असणार आहेत. दुपारी १२.१५ ते १.०० महिलांचे जग आणि जगणे या विषयावर शिवमती स्नेहा टोम्ये, यवतमाळ यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्षस्थानी शिवमती अॅड. वैशाली डोळस छत्रपती संभाजीनगर या असणार आहेत. त्यानंतर दुपारी १ ते २ जेवण असणार आहे. दु. २.०० ते २.४५ नित्य नवे कायदे, नित्य नवा संघर्ष या विषयावर शिवश्री अॅड. मिलिंद पवार, पुणे (प्रसिध्द विधिज्ञ) यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्षस्थानी शिवश्री इंजि. संजय देसाई, कोल्हापुर हे असणार आहेत. दु. २.४५ ते ३.३० कला क्षेत्रातील जातवाद आणि बहुजन समाज या विषयावर शिवश्री किरण माने, सातारा (सुप्रसिद्ध सिने कलाकार व विचारवंत) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्षस्थानी शिवश्री अजित शिरोळे, पुणे (प्रसिद्ध सिने कलावंत) हे असणार आहेत. सत्र २१ वे दु. ३.३० ते ६.०० : समारोप तथा कृतज्ञता समारोह कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अध्यक्षस्थानी शिवश्री इंजि. पुरुषोत्तम खेडेकर (संस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा संघ) हे असणार आहेत. तर शिवश्री जयसिंह उर्फ बाळदादा मोहिते-पाटील (चेअरमन, शं.मो.पा.सह. सा. कारखाना, शंकरनगर) यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीत शिवश्री मदनसिंह मोहिते-पाटील (स्वागताध्यक्ष), शिवश्री इंजि विजयकुमार घोगरे (प्रदेशाध्यक्ष म.से. संघ), शिवश्री इंजि. नवनाथ घाडगे (प्रदेश कार्याध्यक्ष म.से.संघ), शिवश्री इंजि. पुरुषोत्तम कडू (प्रकल्प संचालक – जिजाऊसृष्टी) आदी मान्यवर असणार आहेत. तसेच यावेळी (सामाजिक क्षेत्र) शिवश्री जन्मेजयराजे भोसले, अक्कलकोट, (कला क्षेत्र) शिवश्री नागराज मंजुळे, सिनेदिग्दर्शक, मुंबई, (कला क्षेत्र) शिवश्री किरण माने, सिनेकलावंत, सातारा, (शाहिरी कला) शिवश्री राजेंद्र कांबळे, शिवशाहीर, खुडूस यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. (जिजाऊ रथयात्रा) शिवश्री अर्जुनराव तनपुरे, (जिजाऊ रथयात्रा) शिवश्री सौरभदादा खेडेकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सायं. ६.०० ते ६.३० चहापान होणार आहे. सायं. ६.३० ते ८.३० लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा लावणी उत्सव कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९८५०१७५१५५, ९४२२०६६२९१, ९४२२४६३००२, ९९२१२५४०३४, ९८६०११०१३०, ९४२२०६८८१६, निवास ९६२३३२७५००, ९८२२५१६१६९, ९३७१५३५२१७, ९८३४६८८३३४, ९४२१२८४१०० या नंबर वर संपर्क साधावा.
तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.