अकलूज येथे राम नवमीनिमित्त मोफत गर्भसंस्कार शिबिर.

अकलूज (बारामती झटका)
मनशक्ती सेवा विज्ञान केंद्र अकलूज आणि रोटरी क्लब ऑफ अकलूज यांच्यावतीने रामनवमीनिमित्त रविवार दि. 6 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या कालावधीत स्मृतीभवन शंकरनगर येथे गर्भवती महिलांसाठी मोफत गर्भाचे भावविश्व अर्थात वैज्ञानिक गर्भ संस्कार शिबिर आयोजित केले असल्याची माहिती मनशक्ती केंद्र अकलूजचे केंद्रप्रमुख हनुमंतराव (आप्पा) खडके यांनी दिली.
या शिबिरात कोणत्याही महिन्यातील गर्भवती मातापित्यांना सहभाग घेता येईल. या शिबिरात संस्कार म्हणजे काय व ते कसे करावेत, गर्भासाठी स्वागत, प्रार्थना, संगीत, गोष्ट, गर्भाला कळते याचे पुरावे, स्ट्रोबोस्कोप चाचणी आणि उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन होणार आहे. सुदृढ, सतेज, सुसंस्कारी पिढीसाठी हा विनामूल्य उपक्रम असून यामध्ये गर्भसंस्कारासंबंधीत मोफत पुस्तके ही देण्यात येणार आहेत. याकरिता नाव नोंदणी आवश्यक असून नाव नोंदणीसाठी ॲड. प्रवीण कारंडे 99222 39906, हनुमंत (आप्पा) खडके 99600 02734, प्रिया नागणे 98608 91616, गजानन जवंजाळ 94233 27903 यावर संपर्क साधण्याचे आवाहन ही आयोजकांनी केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.