अकलूज येथे रयतेचा राजा-राजा शिवछत्रपती महानाट्याची जय्यत तयारी
अकलूज (बारामती झटका)
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त दि. २ व ३ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित केलेल्या रयतेचा राजा – राजा शिवछत्रपती या महानाट्याच्या १२५ बाय ७० फुटाच्या भव्य व्यासपीठाचे व नटराज मुर्तीचे पूजन सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आजपासून महानाट्याच्या सरावास प्रारंभ झाला. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी सरावावेळी भेट देवून आवश्यक त्या सूचना दिल्या.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती अकलूज, शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना कामगार वर्ग यांचे वतीने विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकूल, अकलूज येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या महानाट्यात छत्रपती चित्रपट कलावंत शंतनू मोघे, अभिनेत्री पल्लवी वैद्य, रवींद्र कुलकर्णी, अभिनेते विश्वजीत फडते यांच्यासह स्थानिक ९०० हून अधिक कलाकारांचा समावेश आहे. याचे लेखक युवराज पाटील, दिग्दर्शक अजय तपकिरे व सूत्रधार डॉ. विश्वनाथ आवड आहेत. यात घोडे, बैलगाड्या, पायदळ, मावळे दिसणार आहेत. या महानाट्यात शिव जन्मापासून ते शिवराज्याभिषेक सोहळ्यापर्यंतच्या ऐतिहासिक घटनांचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहकार्यांच्या शौर्याची गाथा उलगडणार आहे. या दोन दिवसांच्या महानाट्यासाठी सुमारे एक लाखाहून अधिक रसिक प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत.
सहकार महर्षी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संग्रामसिंह मोहिते पाटील, कु. स्वरुपाराणी मोहिते पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध कमिटी कार्यरत असून क्रीडा संकुल येथे याची जय्यत तयारी सुरु आहे. यावेळी सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/