अकलूज येथे सोनार बांधवांच्या वतीने श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी

अकलूज (बारामती झटका)
अकलूज ता. माळशिरस, येथील लाड सुवर्णकार युवक मंडळ अकलूज यांच्यावतीने श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची 739 वी पुण्यतिथी धार्मिक विधीवत साजरी करण्यात आली. यावेळी ह. भ. प. अनिल महाराज गायकवाड, शिवरत्न भजनी मंडळ बावडा यांची भजन सेवा होऊन दुपारी १२ वा. पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी अकलूज गावचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील व क्रांतिसिंह माने पाटील उपस्थिती होते. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सदानंद दहिवाळ, समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक एकनाथ सदानंद दहिवाळ तसेच रमेश वसंतराव शहाणे, सुधीर वसंतराव शहाणे, दिलीप उदावंत, राजन माळवे, लक्ष्मण बागडे, प्रदीप डहाळे, मंगेश बोराडे, सतीश बोराडे, रवींद्र बोराडे आदी उपस्थित होते.
समाजाचे श्री. राजेंद्र ज्ञानेश्वर माळवे व सौ. वृषाली राजेंद्र माळवे यांनी महाप्रसाद सेवा बजावली. पुण्यतिथी सोहळ्यास सुवर्णकार समाजाचे बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते. लवकरच लाड सुवर्णकार युवक मंडळाच्या वतीने श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंगल कार्यालय उभारण्यात येणार असून यासाठी समाज बांधवांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन करण्यात आले. यावेळी आभार प्रदर्शन संदीप सुधीर शहाणे यांनी केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.