अकलूज येथे यावर्षीचा त्रिमूर्ती केसरी कोण होणार ???

अकलूज (बारामती झटका)
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर अकलूज यांच्यावतीने कर्मवीर बाबासाहेब माने पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, धर्मवीर सदाशिवराव माने पाटील यांच्या कृपाशीर्वादाने श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते पाटील (आक्कसाहेब) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व मा. जयसिंह शंकरराव मोहिते (बाळदादा) व मा. मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील (दादा) यांच्या अमृतमहोत्सवी वाटचालीनिमित्त भव्य अखिल भारतीय त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा 2023 चे आयोजन दिनांक 29, 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023 दरम्यान शिवतीर्थ आखाडा अकलूज, ता. माळशिरस करण्यात आले आहे. सदर त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये खुला गट प्रथम क्र. 2 लाख रु., द्वितीय क्र. 1 लाख 50 हजार रु., तृतीय क्र.1 लाख रु., चतुर्थ क्र. 50 हजार रु. याप्रमाणे असणार आहे. यंदाचे हे वर्ष 45 वे वर्ष आहे.
आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सदर स्पर्धेमध्ये 25, 28, 30, 32, 34, 40, 45, 50, 55, 60, 65, 70, 75, 80, 85 किलो वजनी गटामध्ये स्पर्धा होणार भव्य बक्षिसांची खैरात असणार आहे. तसेच या स्पर्धेमध्ये जो मल्ल पहिला आणि शेवटी पराभूत झाला आहे, त्याला देखील सन्मान करून बक्षीस देण्यात येणार आहे.

वेळापूरचा महाराष्ट्र चॅम्पियन पै. तानाजी माने, पुण्याचा महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहास निमगिरे, निमगावचा पै. गजानन साळुंखे, पंढरपूरचा पै. अस्लम काझी, इंदोरचा हिंदकेसरी पै. रोहित पटेल, सोलापूरचा पै. नितीन खुर्द, हरियाणाचा पै. प्रदीपकुमार, कोल्हापूरचा उपमहाराष्ट्र केसरी पै. नंदकुमार अबदार, जळगाव चा ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी, टाकळी गावचा पै. राजेंद्र राजमाने, कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील, खुडूसचा पै. महादेव सरगर, वेळापूरचा पै. बापू मंडले, दिल्लीचा पै. सोनू यादव, कुर्डूवाडी येथील पै. सुनील शेवतकर, खुडूस येथील पै. सागर मोटे, सदाशिवनगर येथील उपमहाराष्ट्र केसरी पै. विशाल बनकर, सराटी येथील ऑल इंडिया गोल्डमेडलीस्ट पै. माऊली कोकाटे तर टाकळी येथील महाराष्ट्र चॅम्पियनशिप पै. कालीचरण सोलनकर हे सर्व आत्तापर्यंतचे त्रिमूर्ती केसरीचे मानकरी आहेत.
सदर स्पर्ध्येमध्ये अनेक नामवंत मल्लांच्या कुस्त्या होणार आहेत. तरी जास्तीत जास्त वस्ताद, मल्ल सम्राट आणि कुस्ती शौकीन यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. यावर्षीचा त्रिमूर्ती केसरी होण होणार ?, याकडे माळशिरस तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.