अकलूज येथील सुरूबाई बागडे यांचे निधन.
स्माईल एफ.एम. बँड चे डायरेक्टर शंकर बागडे यांना मातृशोक
अकलूज (बारामती झटका)
बागेचीवाडी-अकलूज, ता. माळशिरस येथील श्रीमती सुरूबाई सिताराम बागडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मृत्युसमयी त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सूना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दत्तात्रय बागडे व स्माईल एफ.एम.बॅंडचे डायरेक्ट शंकर बागडे यांच्या त्या आई होत्या.
स्व. सुरुबाई बागडे सांप्रदायिक होत्या. त्यांचा स्वभाव धार्मिक असून त्या मनमिळावू होत्या. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त आहे.
स्व. सुरुबाई बागडे यांच्या निधनाने बागडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परमेश्वर बागडे परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो आणि स्व. सुरुबाई बागडे यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.