अकलूजचे पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांची गडचिरोली अप्पर पोलीस अधीक्षक पदी बढती….

अकलूज (बारामती झटका)
अकलूज उपविभागीय पोलीस अधीक्षक नारायण शिरगावकर यांची गडचिरोली जिल्ह्याला अप्पर पोलीस अधीक्षक पदी बढती झालेली आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या 2012 साली श्री. नारायण शिरगावकर पोलीस उप अधीक्षक पदावर निवड झालेली होती. 2013 ते 14 नाशिक येथे ट्रेनिंग केलेले होते. त्यानंतर त्यांना बीड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर पहिले ट्रेनिंग पदावर काम केलेले होते. त्यानंतर 2015 ते 2018 परभणी जिल्हा येथील गंगाखेड येथे पोलीस उपअधीक्षक पदावर काम केलेले आहे. ते 2018 ते 2021 पुणे जिल्ह्यात बारामती येथे पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत होते. 2021 ते 2024 पुणे शहराला सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून काम केले. 2024 ते 2025 अकलूज उपविभागामध्ये पोलीस उपाअधीक्षक पदावर काम केलेले होते. सध्या सोलापूर नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत होते.

अकलूज उपविभागीय येथे पोलीस उपअधीक्षक पदावर काम करीत असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून पोलीस प्रशासन व जनता यांच्यामधील दरी कमी केलेली होती. माळशिरस तालुक्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पायी वारी पालखी सोहळ्या बरोबर अनेक संतांच्या पालख्या माळशिरस तालुक्यातून जात असतात. अशावेळी पोलीस प्रशासनाचे योग्य नियोजन केलेले होते.

माळशिरस तालुक्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे तीन मुक्काम आणि तीन गोल रिंगण असतात. श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे एक गोल रिंगण व एक उभे रिंगण असते. माळशिरस तालुक्यात धर्मपुरी ग्रामपंचायत हद्दीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज व सराटी पुलावर अकलूज हद्दीत श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे जंगी स्वागत असते. त्यावेळेला वारकऱ्यांना व भाविकांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने वाहतूक व्यवस्था व बंदोबस्त चांगल्या पद्धतीने लावला जातो. यासाठी अकलूज, माळशिरस, वेळापूर, नातेपुते येथील प्रभारी अधिकारी यांच्या समवेत सुसंवाद व सलोखा राखून पालखी सोहळ्याचे नियोजन योग्य पद्धतीने केलेले होते. प्रशासनातील अधिकारी पत्रकार व पोलीस यांच्यामध्ये समन्वय राहावा, यासाठी क्रिकेटसह विविध स्पर्धांचे आयोजन केलेले होते.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर मारकडवाडी गावामध्ये ईव्हीएम विरोधात मोठ्या नेत्यांच्या जंगी सभांचे आयोजन केलेले होते. त्यावेळेस स्थानिक नागरिक यांना त्रास होणार नाही व कायदा सुव्यवस्था अबाधित राहील अशा पद्धतीने नियोजन केलेले होते. अकलूज उपविभागांमध्ये सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, संघटनांचे पदाधिकारी यांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील, अशा पद्धतीने पोलीस प्रशासनात दमदार कामगिरी श्री. नारायण शिरगांवकर यांनी केलेले आहे. तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादाने त्यांना गडचिरोली येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदी बढती मिळालेले आहे. लवकरच प्रमोशन होऊन सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पदी निवड व्हावी, अशी माळशिरस तालुक्यातील जनतेची अपेक्षा आहे..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



