लवंग गावामध्ये कृषीदूतांचे आगमन,शेतकऱ्यांना देणार शेती विषयक मार्गदर्शन

वाघोली (बारामती झटका)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सद्गुरू कृषी महाविद्यालय, मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर चे कृषीदूत यादव राहुल, सरदार निखिल, शिंदे प्रतिक, सातव तुषार, पवार निखिल, व्यवहारे रणजीत, यांचे ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रम २०२५-२६ च्या अभ्यास दौऱ्यानिमित्ताने माळशिरस तालुक्यातील लवंग या गावामध्ये आगमन झाले.
लवंग येथील सरपंच व ग्रामस्थांनी कृषीदूतांचे स्वागत केले. कृषीदूतांच्या आगमनावेळी गावचे सरपंच प्रशांत पाटील, उपसरपंच सज्जन दुरापे, ग्रामसेवक मोहन मिटकल, कृषी सहाय्यक राम कोकाटे, इतर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामीण कृषी कार्यानुभव हा कार्यक्रम कृषी पदवीच्या चतुर्थ वर्षाच्या अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा भाग असून, यात विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि शेतीशी संबंधित समस्यांची प्रत्यक्ष माहिती व्हावी यासाठी या कार्यक्रमांतर्गत पुढील तीन महिने हे विद्यार्थी गावामध्ये मुक्कामी राहून शेतकऱ्यांसाठी विविध कृषीविषयक कार्यक्रम सद्गुरु कृषी महाविद्यालय राबवणार आहेत.
अभ्यासदौऱ्या दरम्यान कृषीदूत शेतकऱ्यांना शेती विषयक शास्त्रीय माहिती, हंगामाप्रमाणे पीक पद्धती, रासायनिक खतांचा योग्य वापर, कीटकनाशके फवारताना घ्यायची काळजी, कीटकनाशक आणि सेंद्रिय शेती याबद्दल माहिती देतील. तसेच माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, कीडरोग पिक संरक्षण व इतर कृषी संबंधित प्रात्यक्षिके कृषीदूतांमार्फत घेतली जातील. सदर अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांना सद्गुरू कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के बिटे सर, कार्यक्रम समन्वय प्रा. सी. बी. माने सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. आर. आढाव सर, महाविद्यालयातील इतर सर्व प्राध्यापक वर्ग आणि विषयक तज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



