ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

अकलूजच्या सिंहांच्या इलाख्यात ढाण्या वाघाचा जनता दरबाराने शिरकाव; जनतेचा उदंड प्रतिसाद…

“बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” या म्हणीचा प्रत्यय अकलूज येथे लोकप्रिय दमदार राम सातपुते यांनी जनता दरबार सुरू केल्याने येत आहे…

अकलूज (बारामती झटका)

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी विधानसभेच्या निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या विचार विनिमय बैठकीत अकलूज येथे जनता दरबार लवकरच सुरू करू, असे भाषणात सांगितलेले होते. “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” या म्हणीचा प्रत्यय अकलूज येथे लोकप्रिय दमदार राम सातपुते यांनी जनता दरबार सुरू केल्याने येत आहे. तर राजकीय वर्तुळात अकलूजच्या सिंहाच्या इलाख्यात ढाण्या वाघाचा जनता दरबाराने शिरकाव झालेला असून जनतेचा उदंड प्रतिसाद मिळालेला आहे.

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते त्यांनी माळशिरस विधानसभा मतदार संघात जनता दरबाराची लोक उपयोगी संकल्पना राबविलेली होती. जनता दरबारामध्ये अनेक गरजू लोक सर्वसामान्य व गोरगरीब जनता आपल्या व्यक्तिगत अडीअडचणी घेऊन येऊन जागच्या जागी अडचणींची सोडवणूक करीत होते. त्यामुळे दिवसेंदिवस जनता दरबाराला उदंड प्रतिसाद सर्वसामान्य व गोरगरीब जनतेतून मिळत होता. लोकांना स्वतःची कैफियत व अडचण मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ तयार झालेले होते.

अनेकांना माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह लोकप्रिय दमदार राम सातपुते यांच्यामुळे पहावयास मिळालेले होते. निवडणुकीच्या निकालानंतर माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात जनतेचा संपर्क वाढविण्याची गरज असल्याने लोकप्रिय दमदार राम सातपुते यांनी अकलूज येथे पहिला जनता दरबार घेतला, त्याला लोकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे. आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात अकलूज येथे सर्वसामान्यांसाठी कधीच हक्काचे व्यासपीठ निर्माण झालेले नव्हते. अकलूजच्या सिंहांचा इलाका ओळखला जातो, यामध्ये ढाण्या वाघाने जनता दरबाराने शिरकाव केलेला असल्याने राजकीय वर्तुळामध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button