अकलुज येथे श्री राजे बागस्वारे पीर देवस्थान उरूस कार्यक्रम २०२५ आयोजन.

अकलूज (बारामती झटका)
अकलूज ता. माळशिरस, येथील विजय चौकातील मुस्लिम समाज व हिंदू समाजाचे एकोप्याचे प्रतिक असलेल्या श्री राजे बागस्वारे पीर देवस्थान उरूस कार्यक्रम २०२५ चे आयोजन केले असल्याचे पुजारी सुनिल हनुमंत लावंड व लावंड परिवार यांनी सांगितले आहे.
सर्व भाविकांना कळविण्यात येते की, सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री राजे बागस्वार बाबा यांचा उरूस साजरा करण्यात येणार आहे. त्याच्या कार्यक्रम पुढीलप्रमाणे – शनिवार २२ मार्च २०२५ चुना लावणे, रविवार २३ मार्च २०२५ संदल, सोमवार २४ मार्च २०२५ उरूस, मंगळवार २५ मार्च २०२५, झेंडा – पालखी, शुक्रवार २८ मार्च २०२५ पाकळणी.

ज्या भाविकांना उरूस कार्यक्रम महाप्रसादासाठी अन्नदान करावयाचे आहे, त्यांनी पुजारी सुनिल हनुमंत लावंड यांचेकडे नाव नोंदणी करावी किंवा मो. नं. ९३७३३१७२१७ / ९५०३९६४२९७ या नंबरवर संपर्क साधावा. महाप्रसाद दि. २४ मार्च २०२५ रोजी दु. १ पासुन सुरु आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, ही विनंती. वरील सर्व कार्यक्रम लावंड परिवार यांच्या मार्फत सालाबादप्रमाणे करणेत येत आहेत. ठिकाण – विजय चौक, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.