अकलूज येथील ब्राह्मण सेवा संघाचे जेष्ठ सदस्य विलास कुलकर्णी यांचे दुःखद निधन

अकलूज (बारामती झटका)
अकलूज ता. माळशिरस येथील ब्राह्मण सेवा संघाचे जेष्ठ सदस्य विलास दिनकरराव कुलकर्णी उर्फ बापूराव (वय ६2) यांचे आज गुरुवार दि. ५ डिसेंबर रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन बंधू, भावजया, पुतणे असा परिवार आहे.
ब्राह्मण सेवा संघाचे माजी अध्यक्ष व वृत्तपत्र विक्रेते श्री. प्रमोद उर्फ अण्णा कुलकर्णी यांचे ते कनिष्ठ बंधू होत. त्यांचेवर अकलूज येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्व. विलास कुलकर्णी यांच्या दु:खद निधनाने कुलकर्णी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परमेश्वर कुलकर्णी परिवाराला या दु:खातून सावरण्याचे बळ देवो आणि मृतात्मास शांती देवो, हीच बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.