अकलूजमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचा डिजिटल फलक समाजकंटकाने फाडला..

अकलूज (बारामती झटका)
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस 19 फेब्रुवारी असतो. या दिवशी माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वाढदिवसाचे शुभेच्छा बॅनर लावलेले आहेत. अकलूज ता. माळशिरस, येथे सुद्धा कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे वाढदिवसाचे डिजिटल फलक वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले आहेत. त्यामधील कर्मवीर चौक अकलूज ता. माळशिरस, माळीनगर रोड वरील मसूद मळा या ठिकाणचे दोन डिजिटल फलक संजय माणिक भाळे रा. मारकडवाडी यांनी खुनशी भावनेतून खासदार यांच्या वाढदिवसाचे डिजिटल फाडलेले आहेत. कार्यकर्त्यांनी सदरच्या इसमाला पकडून आपला राग व्यक्त करून अकलूज पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. अकलूज पोलीस स्टेशन येथे सदरच्या समाजकंटक विरोधात एनसीआर दाखल झालेला आहे. भारतीय न्याय संहिता बी एन एस 2024 कलम 324 (4) प्रमाणे तक्रारदार नागनाथ बाळकृष्ण बनसोडे वय 32 वर्षे, रा. तांबवे ता. माळशिरस यांच्या तक्रारीवरून नोंद झालेली आहे. सदरच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस हेड कॉन्स्टेबल पठाण हे पुढील तपास करीत आहेत.

अकलूज माळेवाडी परिसरात प्रथमच मोहिते पाटील यांच्याशिवाय माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचे मोठे फलक व महत्त्वाच्या ठिकाणी लावलेले आहेत. पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचाही फलक कोणीतरी समाजकंटकाने फाडलेला होता. त्यावेळेस कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष केलेले होते. मात्र, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा डिजिटल फलक फाटल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक होऊन समाजकंटकावर मनसोक्तपणाने राग व्यक्त करून आरोपी बोलोरो गाडी मधून आलेली गाडी सुद्धा पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आलेली आहे. यामुळे भविष्यात समाजकंटक अशी समाजविघातक कृत्य करणार नाहीत.
अकलूज पोलीस स्टेशन यांच्या ताब्यामध्ये आरोपी संजय भाळे आहेत. पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे माळशिरस तालुक्यातील समर्थक सतर्क झालेले आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.