अक्षय डोंगरे यांची वनरक्षक पदी निवड झाल्याबद्दल शेतकरी महासंग्राम प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार संपन्न

इंदापूर (बारामती झटका)
दि 21/02/2024 रोजी इंदापूर तालुक्यातील काटी येथील अक्षय डोंगरे यांची महाराष्ट्र वन विभागात वनरक्षक पदी निवड झाली. त्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये यश संपादन केले आहे. अक्षय यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांना बोलताना सांगितले की, या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटी असल्याशिवाय आपण यश संपादन करू शकत नाही.
त्यांच्या या निवडीने काटी पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन होत असून त्यांना पुढील कार्यासाठी शेतकरी महासंग्राम प्रतिष्ठानच्या वतीने शुभेच्छा देण्यात दिल्या.
यावेळी अॅड. संग्रामदादा नरुटे (अध्यक्ष शेतकरी महासंग्राम प्रतिष्ठान), श्री. विशाल खटके (पोलीस उपनिरीक्षक), श्री. रणजीत मासाळ (प्रगतशील शेतकरी), उद्योजक श्री. राजू साळुंखे, विशाल पवार (बँक अधिकारी) आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.