नातेपुते नगरीचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर नागनाथ भांड उर्फ नाना यांचे दुःखद निधन…

नातेपुते नगरीचे माजी उपसरपंच व माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रशेखर भांड उर्फ नाना काळाच्या पडद्याआड…
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते नगरीचे माजी उपसरपंच व माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रशेखर भांड उर्फ नाना यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी रविवार दि. २२/९/२०२४ रोजी अल्पशा आधाराने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात नितीन व अजय दोन मुले, एक मुलगी, पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. स्वर्गीय नानांचा अंत्यविधी दुपारी 02 वाजता होणार आहे. अंत्ययात्रा घरापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक धनगर गल्ली ते स्मशानभूमी अशी निघणार आहे.
नानांच्या राजकीय कारकिर्दीत नातेपुते व नातेपुते पंचक्रोशीत अनेक विविध विकासकामे झालेली आहेत. नातेपुते नगरीच्या जडणघडणीत नानांचा सिंहाचा वाटा होता. चंद्रशेखर भांड उर्फ नाना यांच्या दुःखद निधनाने भांड परिवारांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांना दुःखातून सावरण्यासाठी ईश्वराने बळ द्यावे व नानांच्या आत्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.