ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

आमदार पत्नी सौ. संस्कृतीताई सातपुते यांचा झंजावाती दौरा, येतात आणि महिलांची मने जिंकून जातात.

माळशिरस तालुक्यातील महिलांना सुखदुःखात सुसंवाद साधण्याची संधी संस्कृतीताई यांच्या रूपाने मिळालेली असल्याने महिलांमध्ये आपली हक्काची ताई अशी वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

माळशिरस (बारामती झटका)

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी संस्कृतीताई राम सातपुते यांचा माळशिरस तालुक्यात अनेक ठिकाणी सुखदुःखात सहभाग व विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने झंजावाती दौरा असतो. संस्कृतीताई येतात आणि महिलांची मने जिंकून जातात. माळशिरस तालुक्यातील महिलांना सुखदुःखात सुसंवाद साधण्याची संस्कृतीताई यांच्या रूपाने संधी मिळालेली असल्याने महिलांमध्ये आपली हक्काची ताई अशी वेगळी ओळख निर्माण झालेली आहे.

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी कार्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. प्रचंड जनसंपर्क ठेवून सर्वांच्या मनामध्ये आमदार साहेब यांनी आपला हक्काचा भाऊ असल्यासारखी ओळख निर्माण केलेली आहे. सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला सुसंवाद साधता यावा, यासाठी जनता दरबाराची सुरुवात माळशिरस तालुक्यात केली आहे. यामुळे व्यक्तिगत व सार्वजनिक अडचणी थेट आमदार यांच्यापर्यंत जनतेला मांडता येत असल्याने जनता दरबार असल्यानंतर गरजूंचा उदंड प्रतिसाद असतो. माळशिरस तालुक्यात आमदार राम सातपुते यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून अनेक वर्षानुवर्षे आजाराचे पेशंट यांना दिलासा देऊन माणसाचा कोणताच अवयव ऑपरेशन विना राहिलेला नाही. समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांची मोफत ऑपरेशन करून लोकप्रिय दमदार आमदार यांनी ‘आरोग्यदूत’ अशी जनतेकडून पदवी प्रदान केल्यासारखी आहे.

भारतीय जनता पक्षाचे विश्वासू व कट्टर समर्थक असल्याने पक्षाने त्यांच्याकडे राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे मुंबई, दिल्ली व बाहेरच्या राज्यात पक्ष संघटन बांधणीसाठी जावे लागते. अशावेळी धर्मपत्नी संस्कृतीताई मतदार संघात सामाजिक कार्यक्रम, लग्न व विविध सुखदुःखाच्या वेळी मतदार संघात भेटीगाठी घेत असतात. विविध कार्यक्रमांमधून महिलांचा थेट संपर्क येत असल्याने शेवटच्या घटकापर्यंत संपर्क येतो. अशावेळी अनेक महिला मनमोकळेपणाने सुसंवाद साधत असतात. महिलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळालेले असल्याने महिलांच्या समस्या ताई ऐकून घेत असतात आणि सोडवण्यासाठी कायम तत्पर असतात.

आमदारांची पत्नी म्हणून गोरगरीब व सर्वसामान्य महिलांना आपुलकी, जिव्हाळा व प्रेम वाटत असते.

संस्कृती ताई समाजामध्ये वावरत असताना कधीच आमदाराची पत्नी आहे, असे वागत नाहीत. सर्वसामान्य महिलांसाठी त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन जमिनीवर बसत असतात. त्यांच्या समवेत खेळसुद्धा खेळत असतात‌. त्यामुळे महिलांमध्ये आपली हक्काची ताई अशी वेगळी ओळख निर्माण झालेली आहे.

वास्तविक पाहता आमदार राम सातपुते व सौ. संस्कृती राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात विकासाचं व विश्वासाचं नातं निर्माण केलेले आहे‌. सर्व जाती धर्मांना आपला हक्काचा भाऊ आणि हक्काची ताई अशी सर्वांची धारणा झालेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button