ताज्या बातम्यासामाजिक

देहात गहू बियाणे चर्चासत्र फोंडशिरस येथे उत्साहात संपन्न

फोंडशिरस (बारामती झटका)

भारतातील अग्रगण्य कृषी-तंत्रज्ञान कंपनी देहात आणि फोंडशिरस येथील सुप्रसिद्ध धायगुडे ॲग्रो एजन्सी व अश्वमेघ कृषी सेवा केंद्र, येळीव यांच्या संयुक्त विद्यमाने, अप्रतिम चव व भरघोस उत्पादन क्षमता असणाऱ्या देहात संशोधित गहू वाण DWS 777 याविषयी मार्गदर्शनपर चर्चासत्र फोंडशिरस, ता. माळशिरस येथे मोठ्या उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक देहातचे महाराष्ट्र राज्य डेप्युटी जनरल मॅनेजर श्री. विशाल राजेभोसले यांनी DWS 777 या वाणाच्या उत्कृष्ट उत्पादनक्षमतेवर भर देत शेतकऱ्यांनी या वाणांची निवड करून जास्तीत जास्त नफा मिळवावा, असे आवाहन केले.

चर्चासत्रात शेतकऱ्यांना DWS 777 वाणाची वैशिष्ट्ये – लांब व चमकदार दाणा, गडद गव्हाळ रंग, न लोळणारा व न पडणारा, अप्रतिम चव, तसेच 1000 दाण्यांचे वजन 48 ग्रॅम असल्याची माहिती देण्यात आली.

तसेच DWS 555 वाणाबाबत – बुटका व ठोस दाणा, MP सिहोर (शरबती) दर्जाची चव, उत्तम उत्पादनक्षमता आणि 1000 दाण्यांचे वजन 46 ग्रॅम असल्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

योगेश कदम (ट्रायल मॅनेजर – पश्चिम महाराष्ट्र) यांनी देहात कंपनीची शेतकरी-केंद्रित भूमिका स्पष्ट करताना, “बियाण्यांपासून बाजारपेठेपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी देहात कटिबद्ध आहे,” असे सांगितले. तसेच गहू व मक्यांच्या नव्या पिढींच्या वाणांसह फ्लेमिओ, टायझोन, अट्राफोर्स, ऑक्सिबिक्स, कॅपियांझा या तणनाशकांची सविस्तर माहिती दिली.

मागील वर्षी देहात DWS 555 व DWS 777 वाणांमधून भरघोस उत्पादन काढून जास्त बाजारभाव मिळविलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

या चर्चासत्राला माळशिरस तालुक्यातील 150 हून अधिक प्रगतशील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या रब्बी हंगामासाठी देहात ‘गहू धमाका 2001’ लकी ड्रॉ बक्षिसांचा खजिना जाहीर करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत प्रदीप तुपे यांनी देहात कंपनीचा परिचय करून देत कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच शेतकऱ्यांना देहातच्या सेवांविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धायगुडे ॲग्रो एजन्सीचे मालक श्री. हनुमंत धायगुडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom