अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उज्वला थिटे यांचा अर्ज बाद ..

भारत देश व महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या बिनविरोध नगराध्यक्षा सौ. प्राजक्ताताई अजिंक्यराणा पाटील ठरल्या…
मोहोळ (बारामती झटका)
मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर गावातील नगरपंचायतीची निवडणूक सध्या राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. यासंदर्भात आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला आहे. अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचे आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवला आहे.
भारत नव्हे तर आशिया खंडातूनच व भारत देश स्वतंत्र काळापासून अखंडित बिनविरोध निवडणूक परंपरा कायम ठेवून भारत देश व महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या बिनविरोध नगराध्यक्षा सौ. प्राजक्ताताई अजिंक्यराणा पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे.
नाद करा पण, अनगरकरांचा करू नका राजकारणी लोकांनी बोध घ्यावा…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



