अनैतिक संबंधामध्ये पतीचा अडसर; प्रियकराच्या मदतीने पतीचा केला खुन…
माळशिरस पोलीसांनी २४ तासात पत्नीसह दोन आरोपींना केले अटक
माळशिरस (बारामती झटका)
दि. २३/०१/२०२५ रोजी माळशिरस पोलीस ठाणेस विजयमाला दत्ता निर्मळ यांनी त्यांचे पती दत्ता निर्मळ वय ४२ वर्षे, रा. निर्मळवाडी ता. व जि. बीड, सध्या रा. चांदापुरी, ता. माळशिरस, हे बेपत्ता झालेबाबत माळशिरस पोलीस ठाणे येथे खबर दिल्याने माळशिरस पोलीस ठाणे मिसींग रजि नं ०७/२०२५ प्रमाणे मिसींग दाखल केली होती. त्याचा तपास पोना/४३१ झगडे यांचेकडे दिला होता. त्या दरम्यान दि. २७/०१/२०२५ रोजी मौजे सुळेवाडी गावचे पोलीस पाटील सौ. वंदना पुंडलीक लोखंडे यांनी फोन करून पोलीस नाईक दत्ता खरात यांना कळविले की, मौजे सुळेवाडी ता. माळशिरस येथील ग्रामपंचायत पाणी पुरवठा विहीरीमध्ये मुरघास भरण्याचे पोत्यामध्ये भरून काहीतरी संशयास्पद टाकले असुन त्याचा खुप घाण वास येत आहे. असे फोनदवारे कळविलेने खात्री करणेकरीता आम्ही पिलीव ओपी कडील पोलीस स्टाफ घेवुन सदर ठिकाणी गेलो असता सदर विहरीमधुन ते लोकांचे मदतीने बाहेर काढले असता मुरघासाचे पोत्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे ४० ते ४५ वयाचे प्रेत असल्याचे दिसले. त्याचे अंगावरती लाल शर्ट व पांढरी बंडी असलेचे दिसले. त्यानंतर सदर अज्ञात इसमास अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन जिवे ठार मारुन मुरघासाचे पोत्यामध्ये भरून त्यामध्ये दगड टाकुन विहीरीत टाकले असल्याचे प्रथमदर्शनी दिसुन आलेने माळशिरस पोलीस ठाणेस गु र नं ३२/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम १०३ (१), २३८ प्रमाणे फिर्याद पोलीस पाटील सौ. वंदना पुंडलीक लोखंडे यांनी गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत.
सदर गुन्हयाचा तपास करणेसाठी श्री. अतुल कुलकर्णी पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामिण, श्री. प्रितमकुमार यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक सो, श्री. नारायण शिरगांवकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. अर्जुन भोसले पंढरपुर विभाग यांचे नेतृत्वाखाली श्री. नारायण पवार पोलीस निरीक्षक माळशिरस पोलीस ठाणे यांनी माळशिरस पोलीस ठाणेकडील सहा. पोलीस निरीक्षक श्री. सुनिल जानकर, सपोनि गोसावी, पोहेका /संतोष घोगरे, पोहेकॉ/स्वरुप शिंदे, पोहेकॉ/हरिश्चंद्र पाटील, पोहेका / पंडित मिसाळ, पोना/दत्ता खरात, पोना/धनाजी झगडे, पोकों/ अजित कडाळे, पोकों/मन्सुर नदाफ यांचे तपास पथक नेमले व त्यांना सदर विहीरीतील मृतदेहाचे वर्णनाप्रमाणे खातरजमा करून नातेवाईकांचा शोध घेण्याचे आदेश दिले. तसेच माळशिरस पोलीस ठाणेकडील दाखल मिसींग मधील मयताचा भाउ अशोक निर्मळ व मयताची पत्नी विजयमाला निर्मळ यांना बोलावुन घेवुन त्यांचेकडुन प्रेताची ओळख पटवली असता सदरचे प्रेत हे मिसींग व्यक्ती नामे दत्ता निर्मळ वय ४२ वर्षे, रा. निर्मळ, रा. निर्मळवाडी, ता. व जि. बीड, सध्या रा. चांदापुरी, ता. माळशिरस असे असल्याचे समजले.
त्यानंतर चौकशी केली असता गोपनीय बातमीदार करवी माहीती मिळाली की, मयताचे पत्नीचे विजयमाला निर्मळ व तुळजीराम उर्फ बबन शिंदे याचेशी अनैतिक संबंध असुन त्यामुळे त्यांचे कुटुंबात वाद होत होते. अशी माहीती मिळालेनंतर पत्नी विजयमाला निर्मळ व तुळजीराम उर्फ बबन शिंदे यांना ताब्यात घेवुन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अर्जुन भोसले पंढरपुर विभाग, पोनि नारायण पवार व माळशिरस पोलीस तपास पथक, सपोनि वायकर व स्थानिक गुन्हे शाखा टीम यांनी त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता मयताचे पत्नी विजयमाला निर्मळ हीने, माझे आणि तुळजीराम उर्फ बबन शिंदे याचे प्रेमसंबध होते. त्याची शंका माझे पती यांना आलेली होती त्यामुळे ते मला सारखे मारहाण करीत होते. त्यामुळे ते माझे प्रेमसंबधात आडवे येत असल्यामुळे त्यांना संपविण्याचे ठरविले होते. त्यामुळे माझे सांगणेवरुन प्रियकर तुळजीराम उर्फ बबन शिंदे, प्रियकराचा मित्र रोहन लोंढे, रा. पठाणवस्ती यांनी पती दत्ता निर्मळ यांना सुळेवाडी येथील तलावाजवळ नेवुन प्रियकर तुळजीराम उर्फ बबन शिंदे, प्रियकराचा मित्र रोहन लोंढे यांनी दारू पाजुन त्याचा गळा आवळुन फास देवुन खुन केला व मुरघासाचे पोत्यात भरून विहीरीत फेकुन दिलेचे कबुल केले आहे. तसेच प्रियकर तुळजीराम उर्फ बबन शिंदे, प्रियकराचा मित्र रोहन लोंढे पठाणवस्ती यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी मयत दत्ता निर्मळ याचा दारू पाजुन सुळेवाडी येथील तळयावरती नेवुन त्याचे गळयाला दोरीने गळा आवळुन त्याचा खुन केला व त्याला पोत्यात भरून पोत्यात दगड टाकुन सदर पोते मौजे सुळेवाडी, ता. माळशिरस येथील ग्रामपंचायत पाणी पुरवठा विहीरीमध्ये टाकुन त्याची विल्हेवाट लावली. अशी त्यांनी कबुली दिली आहे.
सदर गुन्ह्यात मयताची पत्नी विजयमाला निर्मळ, तुळजीराम उर्फ बबन शिंदे, रोहन लोंढे, रा. पठाणवस्ती यांना अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपींना दि. २८/०१/२०२५ ते दिनांक ०६/०१/२०२५ पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.
असा केला बनाव…
मयत दत्ता निर्मळ यांचा आपण गेम केला असेल, असा आपल्यावरती पोलीसांचा व नातेवाईकांचा संशय येणार नाही म्हणुन प्रियकर व पत्नीने मयत दत्ता निर्मळ हे दि. २३/०१/२०२५ रोजी पहाटे ०५.०० वा. चे वेळी पाठीमागुन उसतोड करण्याकरीता येतो असे म्हणाले व ते परत उसतोड करण्याकरीता आलेच नाहीत असे म्हणुन माळशिरस पोलीस ठाणेस मिसींगची तक्रार दिली.
सदरची कामगीरी श्री. अतुल कुलकर्णी पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामिण, श्री. प्रितमकुमार यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक साो, श्री. नारायण शिरगांवकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अर्जुन भोसले पंढरपुर विभाग यांचे नेतृत्वाखाली श्री. नारायण पवार पोलीस निरीक्षक माळशिरस पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री. सुनिल जानकर, सपोनि गोसावी, पोहेका / संतोष घोगरे, पोहेका/स्वरुप शिंदे, पोहेकों/ हरिश्चंद्र पाटील, पोहेकॉ पंडित मिसाळ, पोना/दत्ता खरात, पोना/धनाजी झगडे, पोकों/ अजित कडाळे, पोकों/मन्सुर नदाफ, पोहेकॉ/युसुफ पठाण, तसेच सपोनि वायकर व त्यांची टिम यांनी केला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.