ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

अंकोली येथील अर्चना अंकोलीकर यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर

अंकोली (बारामती झटका) (दशरथ रणदिवे यांजकडून)

मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील अर्चना अंकोलीकर यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.

सकल माळी समाज सेवा संस्था, सोलापूर यांच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार यंदा अंकोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका अर्चना अंकोलीकर यांना जाहीर झाला असून शाळेतील उपक्रमशिल शिक्षिका म्हणून त्यांची ख्याती आहे. रविवार दि. १३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १ वा. समाज कल्याण केंद्र रंगभवन, सोलापूर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांच्या शुभ हस्ते व मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button