अंकोली येथील भैरवनाथ विद्यालयात सोलापूर विद्यापीठाकडून “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” या विषयावर आधारित जनजागृती उपक्रम
अंकोली (बारामती झटका) (दशरथ रणदिवे यांजकडून)
अंकोली येथील भैरवनाथ विद्यालयात सोलापूर विद्यापीठाकडून “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” या विषयावर आधारित जनजागृती करून हा उपक्रम मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.
मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ व संगणकशास्त्र संकुल क्विक हिल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमामध्ये संगणकशास्त्र संकुलातील विद्यार्थिनी तृप्ती तानाजी पवार व तेजश्री तानाजी पवार यांनी “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आजच्या ऑनलाईन युगामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या फसवणुकीबद्दल उदाहरणाद्वारे माहिती दिली. व्हॉट्सअप व इतर सोशल मीडियावर आलेल्या मेसेजेस व लिंकची शहानिशा करावी व त्यानंतर पुढील प्रक्रिया करावी, असे सांगितले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. मोहिते डी. टी. सर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.