ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

अंकोली येथील भैरवनाथ विद्यालयातील विरजा पवार हीची जवाहर नवोदय विद्यालय पोखरापुर येथे निवड

अंकोली (बारामती झटका) (दशरथ रणदिवे यांजकडून)

मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील भैरवनाथ विद्यालयातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनी कुमारी विरजा भारत पवार हीची जवाहर नवोदय विद्यालय, पोखरापुर येथे नुकतीच निवड झाली आहे.

तिला या यशात विभाग प्रमुख श्री. विनायक खटके यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, सचिव विकास देशमुख, सहसचिव (माध्य), बी. एन. पवार, विभागीय चेअरमन संजीव पाटील, विभागीय अधिकारी जगदाळे, उपविभागीय अधिकारी दाभाडे, निकम साहेब, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री. बाबासाहेब क्षीरसागर, सदस्य सज्जनराव पवार, सदस्य संग्रामसिंह पवार, विद्यालयाचे प्राचार्य मोहिते डी. टी., सर्व शिक्षक- शिक्षकेतर सेवक वृंद व आजी – माजी विद्यार्थी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक यांनी तिचे कौतुक करून अभिनंदन केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button