अंकोलीच्या चॅम्पियन्स कराटे क्लबच्या विद्यार्थ्यांचा नऊ पदके व एक ट्रॉफीची कमाई करत दबदबा कायम
अंकोली (बारामती झटका) (दशरथ रणदिवे यांजकडून)
पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अंकोलीच्या चॅम्पियन्स कराटे क्लबच्या विद्यार्थ्यांनी नऊ पदके व एक ट्रॉफी ची कमाई करत आपला दबदबा कायम ठेवला. पुणे येथे नुकत्याच राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत अंकोलीच्या चॅम्पियन्स कराटे क्लबने आपला सहभाग नोंदविला होता.
या क्लबच्या आठ विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची पदके व ट्रॉफी जिंकली आहे. कराटेच्या काता या प्रकारात विक्रांत बबलू बिस्वास याने कास्यपदक, इशाश्री मानाजी रणदिवे हिने कास्य पदक, सृष्टी दशरथ रणदिवे हिने रजत पदक तर कुमिते या कराटे प्रकारात ईशाश्री मानाजी रणदिवे हिने रजत पदक व बाळू नाना घोडके याने कास्य पदक प्राप्त झाले. तसेच समर्थ धोंडीबा भालेराव, समर्थ नामदेव गायकवाड, सुमित बाळकृष्ण घोडके, संचित सुनील माळी यांना पदक मिळाले. तर या कराटे क्लबला मोमॅटो ट्रॉफी मिळाली.
हे खेळाडू शिहान संतोष मोहिते आणि सेन्सई रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंकोली (ता. मोहोळ) भैरवनाथ विद्यालयात नियमित सराव करतात. त्यांच्या या यशाबद्दल स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य बाबासाहेब क्षीरसागर, सज्जनभाऊ पवार, संग्रामसिंह पवार, माजी सरपंच काका पवार, विद्यमान सरपंच पांडुरंग येळवे, प्राचार्य मोहिते सर यांनी अभिनंदन केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
sumatra slim belly tonic reviews: sumatra slim belly tonic reviews
nagano tonic: nagano tonic
okdpb5
0yh1m6