अपक्षांच्या मनधरणीसाठी प्रमुख उमेदवारांची दमछाक…
उमेदवारी अर्ज माघार घेण्यास सुरुवात पाच दिवस असले तरी तीन दिवस सुट्टीत जाणार; दोन दिवसात पळापळ करावी लागणार…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस विधानसभा 254 अनुसूचित जाती राखीव मतदार संघात 25 उमेदवारांनी आपले निकषासह उमेदवारी अर्ज दाखल करून पात्र ठरलेले आहेत. उमेदवारी अर्ज माघार घेण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे. पाच दिवस जरी असले तरी दोनच दिवस सापडणार आहेत, तीन दिवस दीपावली सुट्टी राहणार आहे.
अपक्षांच्या मनधरणीसाठी प्रमुख उमेदवारांची दमछाक होणार आहे. प्रमुख उमेदवारांची मते अपक्ष उमेदवाराला पडू शकतात व त्यामुळे विजयासाठी त्यांची उमेदवारी अडचणीची ठरू शकते. त्यांची मनधरणी करायला सुरुवात झालेली आहे. अर्ज माघारी घेण्याकरिता दि. 04 नोव्हेंबर दुपारी 03 वाजेपर्यंत मुदत आहे. चार वाजता उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे.
पात्र उमेदवारांचे माघार घेण्याची मुदत हि नामनिर्देशनपत्राची छाननी प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर सुरू होत असुन दि. ४/११/२०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे. माघार घेण्याचा विहीत नमुन्यातील अर्ज उमेदवाराने समक्ष हजर राहुन अथवा त्याने लेखी प्राधिकृत केलेला निवडणुक प्रतिनीधी वा सुचक यांनी मा. निवडणुक निर्णय अधिकारी अथवा सहाय्यक निवडणुक अधिकारी यांचेकडे निवडणुक निर्णय अधिकारी यांचे दालनात समक्ष सादर करावा. दि. १ नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबर शासकिय सुटटी असल्याने माघारीचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उर्वरीत कालावधीत माघारीचे अर्ज सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत कार्यालयीन वेळेत स्विकारले जातील. दि. ४/११/२०२४ दुपारी ३.०० नंतर लगेचच चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात
येईल.
निवडणूक उपविभागीय कार्यालय अकलूज येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजया पांगारकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांना सहकार्य सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सुरेश शेजूळ हे काम पाहत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.