कृषिवार्ताताज्या बातम्यासामाजिक

अटल भूजल योजनेचा उडाला बोजवारा, ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने पाण्याऐवजी पैसाच मुरला..

माळशिरस (बारामती झटका)

शासनाने मृद व जलसंधारण विभागाच्या मार्फत अटल भूजल योजना राबविण्यात आलेली आहे. जमिनीवरील पाणी जमिनीत मुरावे त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी अटल भूजल योजना राबविण्यात आलेली आहे. मात्र, अटल भूजल योजनेचा बोजवारा उडालेला असून ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने पाण्याऐवजी पैसा मुरला अशी अवस्था अटल भूजल योजनेची झालेली असल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजीचा सूर पसरलेला आहे.

मृदा व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून अटल भूजल योजनेमध्ये सन २०२३-२४ सालाकरिता कोट्यावधी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात गेटेड चेक डॅम कामाच्या ठिकाणी बारामती झटका टीम यांनी भेट दिली असता सदरच्या ठिकाणी धक्कादायक प्रकार समोर आलेले आहेत. पाणी साठल्यानंतरच जमिनीमध्ये मुरणार आहे. पाणीच साठले नाही तर भूजल कसे होणार, असाही संतप्त शेतकरी यांनी सवाल उपस्थित केलेला आहे.

गेटेड चेक डॅम ठिकाणी असणारे पात्र त्या ठिकाणी मशीनच्या सहाय्याने दोन्ही बाजूने विनाकारण बांध घातले आहेत. त्याचा फायदा पाणी साठपासाठी होत नाही. अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमताने अटल भूजल योजनेचा बोजवारा उडविलेला आहे. एका कामावर अशी अवस्था आहे, तालुक्यात काय परिस्थिती असेल याचा अंदाज करणे अवघड आहे. लवकरच अटल भूजल योजनेचे वास्तव शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असणारी योजना समाज माध्यमांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मृदा व जलसंधारण मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा बारामती झटका टीम प्रयत्न करणार आहे.

तरी शेतकरी बांधव व सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या परिसरामध्ये असे काम सुरू असल्यास सदरच्या ठिकाणचे फोटो व व्हिडिओ पाठवावे. आपले नाव प्रसारित केले जाणार नाही मात्र, आपल्यामुळे अटल भूजल योजना सर्वसामान्य व गोरगरीब शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल यासाठी बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील 98 50 10 49 14 व 91 30 10 32 14 या नंबरशी संपर्क साधावा.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

  1. Great read! The author’s insights were very valuable. I’m looking forward to hearing what others think about this topic. Feel free to check out my profile for more discussions.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button