ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस तालुक्यात राजकीय खळबळ; अजितदादा गटात हजारो कार्यकर्ते सामील होणार..

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याच्या राजकारणाला वेगळे वळण देणारी, राजकीय खळबळ माजवणारी बातमी आहे. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटात माळशिरस तालुक्यातील विशेष करून अकलूज परिसरातील हजारो कार्यकर्ते अजितदादा गटात उद्या सामील होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देशाचे नेते शरदचंद्रजी पवार व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असे दोन गट तयार झालेले आहेत.

युवकांचा ओढा अजितदादा पवार यांच्याकडे वाढला असून त्यांची कार्यशैली व कार्य करण्याची पद्धत यामुळे कार्यकर्त्यांना ताकद व राजकीय बळ दिले जात असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अजितदादा पवार यांच्या गटात असंख्य कार्यकर्ते सामील होत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात माळशिरस तालुका विशेष म्हणजे अकलूजचे नाव राजकीय पटलावर आहे. अशा अकलूज पंचक्रोशीतून हजारो कार्यकर्ते मुंबई येथे अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत.

माळशिरस तालुक्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागणार आहे. अकलूज व माळशिरस तालुक्यातील अनेक नेते व कार्यकर्ते अजितदादा पवार यांच्यावर आरोप करून राष्ट्रवादीतून अन्य पक्षांमध्ये गेलेले आहेत. असे असताना माळशिरस तालुक्यातून विशेष करून अकलूज येथूनच हजारो कार्यकर्ते प्रवेश करीत असल्याने माळशिरस तालुक्याला राजकारणात भविष्यात वेगळे वळण लागणार असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
13:09