अवैधरित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमास अटक व पोलीस कस्टडी रिमांड

नातेपुते पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची विशेष कामगिरी
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था 2026 अनुषंगाने पोलीस पेट्रोलिंगमध्ये वाढ केलेली आहे. त्यादरम्यान बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिंगणापूर पाटी येथील हॉटेल गोल्डन ईरा परिसरात काही व्यक्तींकडे गावठी पिस्तूल आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी दोन पंचांसह घटनास्थळी सापळा रचला. पहाटे 01.35 च्या सुमारास संशयास्पदरीत्या थांबलेल्या एका इसमाला पोलिसांनी घेराव घालून ताब्यात घेतले. त्याची दोन पंचसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल मिळून आले.
अटक करण्यात आलेला आरोपी:
नाव : गौरव पोपट होळकर (वय ३१ वर्षे)
राहणार : १० फाटा, होळ, ता. बारामती, जि. पुणे.
जप्त केलेला मुद्देमाल:
१) गावठी पिस्तूल : ४५,००० रुपये किमतीचे सिल्व्हर रंगाचे देशी बनावटीचे पिस्तूल (ज्याला लाल रंगाचा स्टार आणि काळ्या रंगाची प्लास्टिक पट्टी आहे).
२) काडतुसे : ०३ जिवंत काडतुसे आणि एक मॅगझीन.

त्यानंतर सदर घडले प्रकाराबाबत नातेपुते पोलीस ठाणेकडील पोना/562 राकेश माणिक लोहार यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं 22/2026 शस्त्र अधिनियम कायदा कलम 3,25 प्रमाणे दि. 26/01/2026 रोजी गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोफौ/ सतीश पाटकुलकर हे करीत असून सदर अवैध शस्त्र कुठून आणले ?, कोण कोण साथीदार आहेत, त्याबाबत त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन तपास चालू आहे
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री. अतुल कुलकर्णी सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज श्री. संतोष वाळके यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. महारुद्र परजने व नातेपुते पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण विशेष पथकातील पोसई/ सोनल मोरे, पोलीस हवालदार राहुल रुपनवर, देविदास धोत्रे, पोलीस नाईक राकेश लोहार, पोका / रणजित मदने, पोका/ रमेश बोराटे, चापोका/ संतोष वारे व राहुल वाघमोडे, गोरे यांनी विशेष मेहनत घेतली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



