ताज्या बातम्याराजकारण

बाबाराजे देशमुख यांच्या हातात हात घालून राजकारण करून विकास करू, त्यांच्या पक्षप्रवेशाने भाजपची ताकद वाढणार आहे -ॲड. भानुदास राऊत

जलसंपदा मंत्री ना. गिरीशजी महाजन, मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, मा. आ. राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न.

सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख यांचा व कार्यकर्त्यांचा भाजप पक्ष प्रवेश सोहळा संपन्न…

सदाशिवनगर ( बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीशजी महाजन, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव मुधोजीराव तथा बाबाराजे देशमुख यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्त्यांनी एसएनडी इंटरनॅशनल स्कूल नातेपुते येथे शनिवार दि. 27/12/2025 रोजी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

यावेळी भाजपचे जेष्ठ नेते व नातेपुते नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक ॲड. बी. वाय. राऊत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले, बाबाराजे देशमुख यांनी रेणुका परिवाराच्या माध्यमातून अनेक माणसे व कुटुंब जोडलेली आहेत. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. सरपंच पदापासून जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदापर्यंत काम केलेले आहे. त्यांचा कायम विकासात्मक दृष्टिकोन राहिलेला आहे. बाबाराजे देशमुख यांच्या हातात हात घालून राजकारण करून नातेपुते व परिसराचा विकास करू. जुने कार्यकर्ते आणि नवीन कार्यकर्ते असा कसलाही भेदभाव होणार नाही. त्यांच्या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पक्षाची ताकद वाढणार आहे, असे ॲड. भानुदास राऊत यांनी आपल्या मनोगतांमध्ये बोलताना सांगितले.

यावेळी व्यासपीठावर सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, अकलूज ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच धनंजयभाऊ देशमुख, जयराज पतसंस्थेचे चेअरमन शशिकांत माने पाटील, सदाशिवराव माने पाटील विद्यालयाचे माजी सभापती हिंदुराव माने पाटील, माळशिरस तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय बाबुराव देशमुख यांचे चिरंजीव पांडुरंगभाऊ देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब उर्फ चेतनसिंह केदार सावंत, श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाशबापू पाटील, शिवप्रसाद उद्योग समूहाचे शरदबापू मोरे, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती गणपततात्या वाघमोडे, ज्येष्ठ नेते राजकुमारनाना पाटील, सोपानकाका नारनवर, हनुमंतराव सूळ, डॉ. आप्पासाहेब देशमुख, बाळासाहेब वावरे, बाळासाहेब सरगर, नातेपुते शहर अध्यक्ष राजेंद्र पांढरे (बॉस), नातेपुते मंडल अध्यक्ष संजय देशमुख, उपाध्यक्ष हरिभाऊ पालवे, यांच्यासह विविध संस्था, पतसंस्था, बँका यांचे आजी-माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, विविध गावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom