बाभुळगाव येथील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व व रेशन दुकानदार हरिदास पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन…

बाभूळगाव (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील बाभुळगाव मधील माजी सरपंच शहाजी पराडे यांचे भाऊ सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व रेशन दुकानदार हरिदास दगडू पराडे यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्यामुळे काल गुरुवार दि. २८/११/२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता निधन झाले. त्यांचे वय ६५ होते.
त्यांच्या पश्चात दोन पत्नी कौशल्या हरिदास पराडे, पातराबाई हरिदास पराडे, तीन भाऊ शहाजी पराडे, शिवाजी पराडे, रघुनाथ पराडे मुलगा सुहास पराडे, चार मुली, दोन बहिणी व दोन नातू आहेत. त्यांच्यावर बाभूळगाव येथे अंतिम संस्कार करण्यात आलेले आहे. रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम शनिवार दि. ३०/११/२०२४ रोजी सकाळी ७ वाजता होणार आहे.
पराडे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व हरिदास पराडे यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.