ताज्या बातम्या

बाभुळगाव येथील भगवान दत्तू मिटकल यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन…

अकलूज (बारामती झटका)

श्री. भगवान दत्तू मिटकल उर्फ आण्णा यांचे वयाच्या 72 व्या वर्षी बुधवार दि. 21/08/2024 रोजी वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर अंतिम संस्कार आजच रात्री 09 वाजता अकलाई स्मशानभूमी, अकलूज येथे करण्यात येणार आहेत.

भगवान मिटकल उर्फ आण्णा यांचे मुळ गाव बाभुळगाव आहे. सध्या वास्तव्यास अकलूज येथे आहेत. ते जुन्या काळातील गव्हर्मेंट काॅन्ट्रक्टर होते. आण्णांचा स्वभाव सुसंस्कृत व स्पष्टवक्तेपणा होता. शुध्द आचार, विचार असून ते धार्मिक वृत्तीचे होते. आण्णांच्या शब्दाला किंमत होती. सरळ मार्गाने व्यवसाय करून त्यांनी आपली प्रगती केलेली होती.

अण्णांच्या दुःखद निधनाने मिटकल परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. परमेश्वर मिटकल परिवार यांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो आणि आण्णांच्या मृतात्म्यास शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

7 Comments

  1. Fantastic beat I would like to apprentice while you amend your web site how could i subscribe for a blog site The account helped me a acceptable deal I had been a little bit acquainted of this your broadcast offered bright clear concept

Leave a Reply

Back to top button