“बचेरी येथे श्री स्वामी समर्थां च्या मुर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी”

पिलीव (बारामती झटका) रघुनाथ देवकर यांजकडून
माळशिरस तालुक्यातील पिलीव गावाच्या बचेरी येथे श्री महालक्ष्मीभक्त स्व. हरिभाऊ कांबळे यांचे नातू व श्री. कोमल, अमोल मारुती कांबळे यांनी आपले आई-वडील व कांबळे परिवाराच्या अधिपत्याखाली राहुन धार्मीक कार्यात राहुन श्री स्वामी समर्थांच्या भक्तीत राहीले. त्यांच्या भक्तीत दिवसेंदिवस वाढ होऊन त्यांनी श्री स्वामी समर्थांचे मंदीर बांधुन श्री स्वामींच्या मुर्ती प्रतिष्ठापनेचा संकल्प करुन केवळ म्हणजे केवळ “स्वामी भक्ती पोटी” त्यांनी आपल्या स्वत:च्या हद्दीत आई-वडील, पत्नी व परिवाराच्या सहकार्याने सुंदर व आकर्षक मंदीर बांधुन मोठ्या भक्तीभावाने श्री स्वामी समर्थांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याच्या धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दि. २१/२/२४ रोजी करण्यात आले आहे.
बुधवार दि. २१/०२/२०२४ रोजी ५ वा. सायं. श्री स्वामी समर्थ रथ यात्रेच्या माध्यमातून मिरवणुकीमध्ये श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट) यांच्या मुर्तीची मिरवणूक काढुन टाळमृदुंगाच्या गजरात व स्वामींच्या नावाच्या जयघोषात बचेरी येथील नवीन मंदीरात नेण्याचे आयोजन केले आहे. व गुरुवार दि. २२/०२/२०२४ रोजी धार्मीक विधियुक्त पध्दतीने श्री स्वामींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना व मंदीराच्या कलशाच्या पूजनाचा कार्यक्रम करणार आहेत. यावेळी सद्गुरु कृपांकित ह. भ. प. किशोर महाराज लोखंडे (वेळापुर) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम व महाप्रसादाचेही आयोजन श्री. कोमल, अमोल मारुती कांबळे व परिवाराने सांगीतले असुन सदर कार्यक्रमाची जय्यत तयारी झाल्याचेही सांगीतले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.