ताज्या बातम्याराजकारण

बाळदादांनी रणजीतदादांना लोकसभेच्या निवडणुकीत वाळीत टाकले, भाजपने रणजीतदादांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वाळीत टाकले..


सोलापूर जिल्हा निवडणूक प्रभारी पालकमंत्री नामदार जयकुमार, निवडणूक प्रमुख शहर श्री. रघुनाथ कुलकर्णी, सोलापूर पुर्व, माजी आमदार राम सातपुते, सोलापूर पश्चिम माढा आमदार श्री. सचिन कल्याणशेट्टी यांची नियुक्ती….

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाने केलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२०-२५ करिता महाराष्ट्रातील शहर व ग्रामीण जिल्ह्यासाठी जिल्हा निवडणूक प्रमुख व जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्यासाठी जिल्हा निवडणूक प्रभारी नेमणूक केलेली आहे. तर सोलापूर शहरसाठी श्री. रघुनाथ कुलकर्णी, सोलापूर पूर्व ग्रामीणसाठी माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार श्री. राम सातपुते, सोलापूर पश्चिम ग्रामीण (माढा) साठी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री. सचिन कल्याणशेट्टी यांच्या जिल्हा निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती केलेली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्री. जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना रणजीतदादांना यांना वाळीत टाकले आहे, असे विधान केलेले होते. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व विधानसभेचे अधिकृत उमेदवार श्री. राम सातपुते यांच्या प्रचारावेळी भाजपचे विधान परिषदेचे आमदार असताना सुद्धा निवडणुकीत अलिप्त राहिलेले होते. भारतीय जनता पक्षाशी केलेल्या गद्दारीची दखल घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रणजीतदादांना महाराष्ट्रामधील कोणत्याच जिल्ह्यातील जबाबदारी न देता वाळीत टाकले आहे…

लोकसभा निवडणुकीत सोलापूर शहरांमध्ये राम सातपुते व माळशिरस शहरात रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आले होते. त्यावेळेस भाजपचे विधान परिषद आमदार रणजीतसिंह माहिती पाटील जाणीवपूर्वक अनुपस्थितीत होते. विधानसभेच्या वेळी अकलूज येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी सभेसाठी आलेले असताना रणजीतदादा तालुक्यात असताना सुद्धा मुद्दाम उपस्थित राहिलेले नव्हते. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री यांचे संकटमोचन समजले जाणारे जलसंपदा मंत्री नामदार गिरीजी महाजन शिवरत्न बंगला येथे आले असता कार्यकर्त्यांनी असभ्य वर्तन केलेले होते. त्यावेळेस रणजीतसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी भूमिका घेतलेली होती. भाजप पक्षाने त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी माजी आमदार राम सातपुते, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, तालुका अध्यक्ष ॲड. शरदजी मदने यांनी पक्षाकडे हकालपट्टीची मागणी केलेली होती. परंतु, रणजीतसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषद राज्यपाल नियुक्त असल्याने भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर त्यांची आमदारकी तशीच राहणार होती म्हणून पक्षाने रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उलट्या गिणतीला सुरुवात केलेली होती.

कार्यक्रमातून नाव वगळणे त्यांच्या निवेदनाकडे व त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार समाज माध्यमाने पाहिलेले आहेत. कुठून तरी जवळ जाऊन सोशल मीडियावर संभ्रम पसरवण्याचे काम सुरू होते. हकालपट्टीची मागणी करणाऱ्या माजी आमदार राम सातपुते यांचे भाजपमध्ये काहीच चालत नाही, ऐकून घेतले जात नाही. अशा वावड्या मोहिते पाटील समर्थक वेळोवेळी उडवत होते. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वांकडून योग्य वेळी रणजीतसिंह यांचा बंदोबस्त करण्यात येईल, असे सांगण्यात आलेले होते. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल आणि तंतोतंत तसाच निर्णय घेतलेला आहे.

जयसिंह शंकरराव मोहिते पाटील तत्कालीन चेअरमन असणाऱ्या सुमित्रा पतसंस्था, आमदार रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील चेअरमन असलेल्या श्री शंकर सहकारी साखर कारखाना, मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील सभापती असलेल्या अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती या तिन्ही संस्थांची एकाच वेळी चौकशी सुरू झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भाजपचे असताना सुद्धा लोकसभा व विधानसभा निवडणुकीत गद्दारी व भाजप पक्षाशी बेईमानी करणारे रणजीतसिंह मोहिते पाटील भाजपचे आमदार असताना सुद्धा चौकशी लागलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष बोलत नाही मात्र, कार्यक्रम करण्यामध्ये चुकत नाही. योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. जयसिंह मोहिते पाटील यांनी साखर कारखान्याच्या कार्यक्रमांमध्ये रणजीतदादांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढण्याचे जाहीर सभेत सांगितलेले होते. त्यामुळे भाजपने पक्षहीन नेतृत्व करून टाकलेले आहे. माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चा सुरू आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom